मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Team India ला मोठा धक्का; ऑलराऊंडर खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, ऋषभ पंतही दुखापतग्रस्त

Team India ला मोठा धक्का; ऑलराऊंडर खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, ऋषभ पंतही दुखापतग्रस्त

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेल्या टीम इंडियासाठी (team india) आणखी एक वाईट बातमी आली आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेल्या टीम इंडियासाठी (team india) आणखी एक वाईट बातमी आली आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेल्या टीम इंडियासाठी (team india) आणखी एक वाईट बातमी आली आहे.

सिडनी, 09 जानेवारी: ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेल्या टीम इंडियासाठी (team india) आणखी एक वाईट बातमी आली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra jadeja) आता पुढील सामने खेळू शकणार नाही. सिडनीत (Sydney) सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर (Fracture) झालं आहे. त्यामुळं जडेजा सिडनी कसोटीच्या दुसर्‍या डावातही फलंदाजी करू शकणार नाही. तसेच तो ब्रिसबेन येथे होणाऱ्या कसोटीतही खेळू शकणार नाही.

दुसरीकडे, ऋषभ पंतही दुखापतग्रस्त झाला असून त्याच्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे. परंतु तो दुसर्‍या डावात फलंदाजी करणार असल्याची माहिती बातम्यांमधून समोर येत आहे. फलंदाजी करत असताना रवींद्र जडेजाला मिशेल स्टार्कच्या चेंडूचा मार बसला आहे. मिशेल स्टार्कने रवींद्र जडेजाला शॉर्ट बॉल टाकला होता. हा बॉल थेट जडेजाच्या थेट अंगठ्यावर जावून आदळला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्रास झाला.

हे ही वाचा-धोनीने झिवासोबत केली पहिलीच जाहिरात; बाप-लेकीचा VIDEO VIRAL

यानंतर जडेजाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, तपासणीत त्याच्या अंगठ्याचं हाड मोडलं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तो आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे पंतच्या हाताच्या कोपऱ्यालाही दुखापत झाली आहे. पण तो किरकोळ जखमी आहे. त्यामुळे तो दुसर्‍या डावात फलंदाजी करताना दिसू शकतो.

जडेजा मालिकेतून बाहेर पडणे मोठा धक्का

ऑस्ट्रेलिया दौर्‍यातून जडेजाचं बाहेर पडणं हे टीम इंडियाला मोठा धक्का बसल्यासारखं आहे. कारण जडेजा गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीत फॉर्मात होता. मेलबर्न कसोटीत जडेजाने शानदार अर्धशतकही झळकावलं होतं. तसेच सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात जडेजाने चार विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय जडेजाने क्षेत्ररक्षण करतानाही मोलाचं योगदान दिलं आहे. पहिल्या डावात जडेजाने स्टीव्ह स्मिथला 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून थ्रो मारून आऊट केला होता.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Ravindra jadeja, Rishabh pant