Ins vs Aus 1st Test Match- अवघ्या ३०० सेकंदात पाहा Day 5 च्या हायलाइट्स

Ins vs Aus 1st Test Match- अवघ्या ३०० सेकंदात पाहा Day 5 च्या हायलाइट्स

पाचव्या दिवसापर्यंत गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी विजय मिळवला.

  • Share this:

एडिलेट येथील पहिला कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी फार महत्त्वपूर्ण होता. पाचव्या दिवसापर्यंत गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी विजय मिळवला. शेवटच्या सेशनपर्यंत गेलेला हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकतं की काय असा प्रश्न काहीवेळा क्रिकेट रसिकांना पडला होता. पण मोक्याच्याक्षणी भारतीय गोलंदाजांनी गडी बाद करत अखेर भारताच्या नावावर पहिला विजय मिळवून दिला.

एकीकडे चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणेने फलंदाजीची बाजू सांभाळून धरली तर दुसरीकडे आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्माने आपल्या भेदक माऱ्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मान वर करू दिली नाही. या पुढच्या व्हिडिओमधून पाचवा दिवस भारतीय खेळाडूंसाठी किती खास होता ते पाहू...

भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. आर, अश्निनने हेजलवूडला बाद करत भारतासाठी विजय सुकर करुन दिला. भारतासाठी जसप्रीत बुमराह, आर. अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर इशांत शर्माने १ गडी बाद केला.

ऑस्ट्रेलियासाठी फलंदाज शॉन मार्शने सर्वाधिक ६० धावा केल्या. मार्शशिवाय कोणत्याही फलंदाजाने ४० च्या पुढे धावा केल्या नाहीत. भारतासाठी चेतेश्वर पुजाराने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पहिल्या डावात १२३ धावा तर दुसऱ्या डावात ७१ धावा करुन भारतासाठी धावांचा डोंगर उभा करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. मॅन ऑफ दी मॅच म्हणून त्याचा गौरवही करण्यात आला.

India vs Australia 1st Test- टीम विराटने असा सेलिब्रेट केला ऐतिहासिक विजय

भारताने आज ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने एक इतिहास रचला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात तब्बल १० वर्षांपूर्वी धूळ चारली होती. २००८ मध्ये झालेल्या पर्थ कसोटीत भारताने विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्यापासूनच मजबूत पकड निर्माण केली आहे. या विजयासोबत कोहली इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला.

केएल राहुलने बॅटिंगदरम्यान उचलला बॉल, टिम पेनने घेतला आक्षेप

दरम्यान,भारताने दुसऱ्या डावात ३०७ धावा केल्या . पहिल्या डावातील 15 धावांच्या आघाडीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 323 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चौथ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतर भारताने ३ बाद १५१ धावांहून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर ४० धावांवर नाबाद असणाऱ्या चेतेश्वर पुजाऱ्याने आपलं अर्धशतक साजरं केलं. अर्धशतक केल्यानंतर पुजारा ७१ धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणेनेही चांगली खेळी करत ७० धावा केल्या. रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. रोहित फक्त १ धाव घेऊन बाद झाला.

First published: December 10, 2018, 12:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading