विर्दभात पावसाची शक्यता; किमान तापमानातही वाढ

विर्दभात पावसाची शक्यता; किमान तापमानातही वाढ

९ ते 12 डिसेंबर दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचीही शक्यता असून, राज्याच्या किमान तापमानातही वाढ झाली असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं.

  • Share this:

पुणे, 9 डिसेंबर : ढगाळ वातावरणामुळे गेल्या कही दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली असून, ही वाढ आणखी काही दिवस अशीच कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. तर 9 ते 12 डिसेंबर दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचीही शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आर्णी, घाटंजी आणि वणी तालुक्यात झालेल्या या अवकाळी पावसामुळे कपाशी आणि तुरीच्या पिकाचं नुकसान होण्याची दाट शक्यता अकोला पंजाबरा देशमुख विद्यापिठाच्या अधिकाऱ्यांनी न्यूज18 लोकमतकडे व्यक्त केली.

सुरुवातीच्या कमी पावसामुळे या पिकांच्या उत्पादनात घट झाली. त्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला जोतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. असं झालंच, तर दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट देखील कोसळेल असंही त्यांनी सांगितलं.

ढगाळ वातावरणामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. ही वाढ आणखी काही दिवस अशीच कायम राहणार असून, 9 ते 12 डिसेंबर दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.

रविवारी सकाळी संपलेल्या 24 तासात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे 11.3 अंश सेल्सिअस नोंदविलं गेलं. यवतमाळात 18.4 अंश सेल्सिअस नोंदविलं गेलं. मुंबईच्या कुलाबा येथे 20.5 तर सांताक्रूझ येथे 17.0 अंश सेल्सिअस नोंदविलं गेलं. पुण्याचं किमान तापमान 15.0 होतं. औरंगाबाद, परभणी आणि नांदेडचं तापमान अमुक्रमे 15.6, 18.5 आणि 21.0 अंश सेल्सिअस असं होतं. महाबळेश्वरचा पारा वाढला असून, गेल्या अठवड्यात 9 अंशाच्या खाली आलेलं मिनी काश्मीरचं तापमान 15.6 वर गेलंय. कोल्हापूर आणि जळगावचं तापमान अनुक्रमे 21.2, 15.2 अंश सेल्सिअस नोंदविलं गेलं.

राज्यात अनेक ठिकाणच्या किमान तापमानात 2 ते 6 अंशापर्यंत वाढ झाली आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागात सुद्धा किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ झाली आहे. तर राज्याच्या उर्वरित भागाचं किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं. हवामान विभागानं येत्या 48 तासांत विदर्भात पावसाचा शक्यता वर्तवली आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात हवामान कोरडं राहील असं म्हटलंय.

रविवारी राज्यातील विविध ठिकाणचं किमान तापमान असं होतं..

मुंबई (कुलाबा) 20.5

मुंबई (सांताक्रूज) 17.0

पुणे 15.0

महाबळेश्वर 15.6

औरंगाबाद 15.6

अलिबाग 19.3

नागपूर 16.1

अमरावती 17.4

अकोला 18.9

बुलडाणा 18.5

चंद्रपूर 20.6

ब्रम्हपूरी 15.9

गोंदिया 14.5

वर्धा 18.0

यवतमाळ 18.4

कोल्हापूर 21.2

मालेगाव 13.6

नाशिक 11.3

सांगली 18.1

सातारा 16.9

सोलापूर 21.4

रत्नागिरी 21.2

पणजी (गोवा) 24.2

डहाणू 18.0

 यवतमाळमध्ये पावसाच्या सरी, ऐन दुष्काळात वातावरणात पसरला गारवा

First published: December 9, 2018, 7:20 PM IST

ताज्या बातम्या