Home /News /news /

Petrol Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; पेट्रोल-डिझेल तुमच्या शहरात कसं विकलं जातंय, चेक करा किमती

Petrol Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; पेट्रोल-डिझेल तुमच्या शहरात कसं विकलं जातंय, चेक करा किमती

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात.

    मुंबई, 14 मे : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Prices) आज, शनिवारी जाहीर केले आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचा दर (Crude Oil Prices) पुन्हा 110 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र आज दरात कोणतीही वाढ झालेली नाही. आज सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 109 डॉलरच्या वर जात आहे. ब्रेंट क्रूडची किंमत 110 डॉलरच्या वर गेल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढू लागतील, असेही मुख्य आर्थिक सल्लागारांनी आधीच सांगितले आहे. सध्या कंपन्यांनी 6 एप्रिलपासून तेलाच्या किमती वाढवलेल्या नाहीत. दिल्लीत पेट्रोल 105 रुपये आणि मुंबईत 120 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. FD मधील पैसेही होणार कमी! महागाई तुमच्या खिशावर कशी मारतेय डल्ला? घरचं बजेट आता नव्याने करावं लागणार चार महानगरांत पेट्रोल-डिझेल दर >> दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. IPL प्रसारण हक्क खरेदी करण्याच्या शर्यतीमध्ये Google ची एन्ट्री! SMS किंवा कॉलद्वारे जाणून घ्या इंधन दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या