मुंबई, 16 सप्टेंबर : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भरती सुरूच आहे. आज परभणीचे माजी अपक्ष आमदार आणि अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट आणि त्यांचे नातू भरत घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. घनदाट हे परभणीतून अपक्ष आमदार म्हणून निवडले गेले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी घनदाट यांनी विधिमंडळात शिपाई म्हणून 17 वर्षं काम केलं होतं आणि टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ३ वर्षं काम केलं होतं.
खेड हादरलं! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आठवड्यातील दुसरी घटना
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला होता. यावेळी प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय आणि स्वानंदी देखील उपस्थित होते. तर यावेळी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि नियुक्त्या देखील करण्यात आल्या.
देशात कोरोनाच्या रुग्णांनी गाठला 50 लाखांचा टप्पा, वाचा 24 तासांतली आकडेवारी
तर जुलै महिन्यात शिवनेनेचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्या या प्रवेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पारनेर येथील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांनी अवघ्या चार दिवसांत घरवापसी केली होती. पाचही नगरसेवकांनी 'मातोश्री'वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुन्हा शिवबंधन बांधले होते.