Home /News /news /

निम्न मध्यवर्गीयांसाठी खुशखबर, 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार ?

निम्न मध्यवर्गीयांसाठी खुशखबर, 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार ?

Prime Minister Narendra Modi (R) listens to Finance Minister Arun Jaitley during the Global Business Summit in New Delhi January 16, 2015. REUTERS/Anindito Mukherjee/Files

Prime Minister Narendra Modi (R) listens to Finance Minister Arun Jaitley during the Global Business Summit in New Delhi January 16, 2015. REUTERS/Anindito Mukherjee/Files

येत्या 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मोदी सरकार निम्न मध्यमवर्गीयांना एक मोठी खुशखबर देऊ शकतं. आयकर मुक्त उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांवरून 3 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय मोदी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली घेऊ शकतात.

10 जानेवारी, नवीदिल्ली : येत्या 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मोदी सरकार निम्न मध्यमवर्गीयांना एक मोठी खुशखबर देऊ शकतं. आयकर मुक्त उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांवरून 3 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय मोदी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली घेऊ शकतात. येत्या 1 फेब्रुवारीला यासंबधीचा निर्णय झाला तर 3 लाखापर्यंतचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना आयकर भरावा लागणार नाही. 2019च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यासंबंधीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गेल्या वर्षीच्या बजेटमध्येही सरकारने 2.5 ते 5 लाखांपर्यंतच्या स्लॅबसाठीचा आयकर 10 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणला होता. त्याचा मध्यमवर्गीयांना मोठा फायदा झालाय. त्याच धर्तीवर यावर्षी तीन लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं जाऊ शकतं. एवढंच नाहीतर टॅक्सस्लॅबही वाढवले जाऊ शकतात. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाची बैठक होत आहे. या बैठकीला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. वर्ष 2018-19 चं बजेट हे मोदी सरकारच्या कार्यकाळाचं शेवटचं पूर्ण बजेट असेल. या बजेटमध्ये सरकार मध्यमवर्गाला दिलासा देण्याची शक्यता आहे. सध्याचे टॅक्सस्लॅब - 2.5 लाखापर्यंत उत्पन्न - करमुक्त 2.5 ते 5 लाख - 5 टक्के 5 ते 10 लाख - 20 टक्के 10 लाखाहून अधिक - 30 टक्के
First published:

Tags: आयकर, करमुक्त उत्पन्न, निम्न मध्यमवर्गीय

पुढील बातम्या