1 फेब्रुवारीला सरकार करणार मोठी घोषणा, इनकम टॅक्समध्ये बदल करण्याची तयारी

1 फेब्रुवारीला सरकार करणार मोठी घोषणा, इनकम टॅक्समध्ये बदल करण्याची तयारी

इनकम टॅक्स, GST, रोजगारीची आकडेवारी, प्रमुख 8 क्षेत्रांतलं उत्पादन या सगळ्या मुद्द्यांवर सरकार काय सुधारणा करतं त्यावरही आर्थिक प्रगतीचा दर अवलंबून आहे.त्यामुळे अर्थमंंत्री निर्मला सीतारामन यांना या मुद्द्यांवर लक्ष द्यावं लागणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 जानेवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढच्या महिन्यात दुसऱ्यांदा बजेट सादर करतील. आर्थिक मंदी आणि कॉर्पोरेट टॅक्समध्ये केलेली कपात यामुळे इनकम टॅक्स कपातीची शक्यता कमी आहे. मागच्या वर्षी सादर केलेल्या बजेटमध्ये अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी काहीच पावलं उचलली नाहीत, अशी टीका त्यांच्यावर झाली. कॉर्पोरेट टॅक्समध्ये केलेल्या कपातीमुळे 1.45 लाख कोटी रुपयांचा महसूल घटलाय.

GST चे दर वाढणार ?

2019 मध्ये GST चे दर अनेक वेळा घटले आहेत. गृहनिर्माण, इलेक्ट्रिक वाहनं, हॉटेलमध्ये राहणं, हिरे उद्योग, आउटडोअर कॅटरिंग यावरचे GST चे दर वाढणार आहेत. देशाचा GDP घसरल्यामुळे अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. या सगळ्या स्थितीत सामान्य माणसाला करांबद्दल काही दिलासा द्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. सध्या 2.5 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे. अडीच लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर 5 टक्के कर आहे.

(हेही वाचा : सरकारी पेन्शन योजनेत होणार मोठे बदल, करमुक्तीसोबत हेही फायदे)

अर्थसंकल्पाकडे लक्ष

5 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आहे.10 लाख रुपय़ांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर आहे. सरकार इनकम टॅक्सच्या स्लॅबमध्ये बदल करू शकतं, अशी माहिती आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे.

इनकम टॅक्स, GST, रोजगारीची आकडेवारी, प्रमुख 8 क्षेत्रांतलं उत्पादन या सगळ्या मुद्द्यांवर सरकार काय सुधारणा करतं त्यावरही आर्थिक प्रगतीचा दर अवलंबून आहे.त्यामुळे अर्थमंंत्री निर्मला सीतारामन यांना या मुद्द्यांवर लक्ष द्यावं लागणार आहे.

====================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: January 1, 2020, 9:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading