• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • Rakesh Jhunjhunwala Portfolio : बिग बुल राकेश झुनझुनवाला यांची 46 स्टॉक्समध्ये गुंतवणूक, पाहा संपूर्ण लिस्ट

Rakesh Jhunjhunwala Portfolio : बिग बुल राकेश झुनझुनवाला यांची 46 स्टॉक्समध्ये गुंतवणूक, पाहा संपूर्ण लिस्ट

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा टाटा मोटर्समध्ये (Tata Motors) 1.1 टक्के हिस्सा आहे. Aptech Ltd. मध्ये राकेश झुनझुनवाला यांची कंपनीमध्ये सुमारे 23.7 टक्के भागीदारी आहे.

  • Share this:
    मुंबई, 19 ऑक्टोबर : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करायला अनेकजण उत्सुक असतात मात्र कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो. त्यामुळे अनेकजण एक्सपर्टचे सल्ले किंवा जे मोठमोठे गुंतवणूकदार आहेत त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ट्रेड करतात. तसेच मोठ्या गुंतवणूकदारांची पोर्टफोलियो देखील अनेकजण फॉलो करतात. शेअर बाजारातील बिग बुल अर्थात राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) हे कुठे पैसे गुंतवतात याकडेही अनेकांची नजर असते. कारण राकेश झुनझुनवाला यांची ताकद अशी आहे की ज्या शेअरमध्ये ते गुंतवणूक करतात तो शेअर स्पीड पकडतो अशी त्याची ओळख आहे. राकेश झुनझुनवाला यांनी देखील अवघ्या 5 हजार रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूक सुरु केली होती. आज त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांनी बंपर कमाई करुन दिली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या यशाचं कारण म्हणजे ते ज्या कंपनीत गुंतवणूक करायची त्याची बारकाईने माहिती घेतात आणि मगच गुंतवणूक करतात. 'आज तक'च्या वृत्तानुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये (Rakesh Jhunjhunwala Portfolio) टाटा समूहाच्या अनेक कंपन्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी मोठी रक्कम गुंतवली आहे. त्यांनी टाटा मोटर्स (Tata Motors) आणि टाटा कम्युनिकेशन्समधील (Tata Telecommunications) गुंतवणूक वाढवली आहे. झुनझुनवाला यांची टाटा समूहाच्या 3 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. राकेश झुनझुनवाला यांनी पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या नावाने टाटा कम्युनिकेशन्समध्ये गुंतवणूक केली आहे. आता या कंपनीतील झुनझुनवाला यांची भागीदारी 1.04 टक्क्यांवरून 1.08 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टाटा कम्युनिकेशन्सचे 30,75,687 शेअर्स आहेत. राकेश झुनझुनवाला यांनी अनेक सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा मोटर्समध्ये 1.1 टक्के भागिदारी राकेश झुनझुनवाला यांचा टाटा मोटर्समध्ये 1.1 टक्के हिस्सा आहे. गेल्या काही दिवसांपासून टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. झुनझुनवाला यांचे टाटा मोटर्समध्ये एकूण 3.77 कोटी शेअर्स आहेत. यासोबतच, राकेश झुनझुनवाला यांचा टाटा समूहाची कंपनी टायटनमध्ये 4.81 टक्के हिस्सा आहे. टायटनचे झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 4.26 कोटी शेअर्स आहेत. Aptech Ltd. मध्ये सुमारे 23.7 टक्के भागीदारी याव्यतिरिक्त Aptech Ltd. मध्ये राकेश झुनझुनवाला यांची कंपनीमध्ये सुमारे 23.7 टक्के भागीदारी आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीच्या शेअर्सची संख्या 9,668,840 वर आली आहे. Fortis Healthcare मधील राकेश झुनझुनवाला यांचा हिस्सा सप्टेंबर तिमाहीनुसार 4.3 टक्के होता. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे 31,950,000 शेअर्स आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत रेखा आणि राकेश झुनझुनवाला यांची मिळून अॅग्रो टेक फूड्समध्ये (Agro Tech Foods) 2 टक्के भागीदारी आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील इतर स्टॉक्स राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियो मध्ये जवळपास 46 स्टॉक्स आहेत. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये Man Infraconstruction, Lupin Ltd, Canara Bank, NALCO, Firstsource Solutions, Prakash Pipes, Orient Cement, Tarc Ltd, Anant Raj, NCC, Wockhardt, Autoline Industries Ltd., Bilcare Ltd, CRISIL Ltd, DB Realty Ltd, Delta Corp Ltd, Edelweiss Financial Services Ltd या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे. तसेच Escorts Ltd, Geojit Financial Services Ltd, Ion Exchange (India) Ltd, Jubilant Pharmova Ltd, Karur Vysya Bank Ltd, Multi Commodity Exchange Of India Ltd, Prakash Industries Ltd, Prozone Intu Properties Ltd, Rallis India Ltd, The Federal Bank Ltd आणि The Mandhana Retail Ventures Ltd या कंपन्यामध्येही राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केली आहे. National Aluminium Company Ltd, Steel Authority Of India Ltd, Indiabulls Housing Finance Ltd, Nazara Technologies Ltd, Jubilant Ingrevia Ltd, VA Tech Wabag Ltd, Indiabulls Real Estate Ltd, Indian Hotels Company Ltd, Dishman Carbogen Amcis Ltd, GMR Infrastructure Ltd, VIP Industries Ltd आणि TV18 Broadcast Ltd मध्येही राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published: