विरुष्का या देशात करणार नवीन वर्षाचं सेलिब्रेशन

विरुष्का या देशात करणार नवीन वर्षाचं सेलिब्रेशन

झिरो चित्रपटाची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे. अनुष्का शर्मा चित्रपटाच्या प्रोमोशनमधून वेळ काढून न्यू इयर सेलिब्रेशनसाठी परदेशात गेली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 डिसेंबर : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या झिरो सिनेमामुळे फारच चर्चेत आली आहे. नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे प्रेक्षकही दोन विचारांचे असतात. म्हणून झिरो सिनेमातील तिच्या भूमिकेबद्दल कौतुकही केलं जातं आहे आणि स्तुतीही केली जात आहे.

सिनेमाविषयी सगळीकडे चर्चा सुरू असताना अनुष्काला मात्र याबद्दल काही एक पडली नाही. अनुष्का आणि विराट ख्रिसमसचं सेलिब्रेशन करण्यासाठी परदेशात करणार आहेत. नवीन वर्ष साजरा करण्यासाठी अनुष्का ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे.

भारताचा कॅप्टन विराट कोहली सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी टेस्ट सिरिजसाठी ऑस्ट्रेलियामध्येच आहे. सिरीजचा तिसरा सामना 26 डिसेंबरला होणार आहे. आणि त्यानंतर शेवटचा सामना 3 जानेवारीला सिडनीमध्ये होणार आहे.

यादरम्यान, विराट अनुष्का नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करणार आहेत. नुकताच अनुष्का शर्मा ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी मुंबई एअरपोर्टवर दिसली. त्यावेळी तिने ब्लॅक अॅण्ड व्हाईट रंगाचे कपडे घातले होते ज्यात ती फार सुंदर दिसत होती.

 

झिरो चित्रपटानंतर अनुष्कानं आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आता कुटुंबाला वेळ द्यायचं ठरवलं आहे. म्हणूनचं बहुतेक तिने अजुन दुसरा कोणताच सिनेमा साईन केला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2018 06:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading