Weather Update: मुंबईसह राज्यातील 'या' भागांत 6 ते 8 सप्टेंबरपर्यंत होणार अतिवृष्टी!

मध्य महाराष्ट्र, विदर्भातदेखील पुढच्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढच्या 4 दिवसांत महाराष्ट्रात कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 08:23 AM IST

Weather Update: मुंबईसह राज्यातील 'या' भागांत 6 ते 8 सप्टेंबरपर्यंत होणार अतिवृष्टी!

मुंबई, 06 सप्टेंबर : गेल्या दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे नेहमी प्रमाणे मुंबईचे हाल झाले. अनेक उपनगरांमध्ये पाणी साचलं होतं तर रेल्वेही बंद पडली होती. गुरुवारी मुंबईत पावसाचा जोर ओसरलेला पाहायला मिळाला. पण येत्या काही दिवसांमध्ये कोकण, गोव्याच्या तुरळक भागांता मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भातदेखील पुढच्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढच्या 4 दिवसांत महाराष्ट्रात कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 6 ते 8 सप्टेंबर दरम्यान विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी 24 तासांत कोकण आणि गोव्यात अतिवृष्टी झाली आहे.  पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाल्यामुळे कोयना, राधानगरी धरण परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे परिसरात पुराचा धोका निर्माण झाला आहे. घाट परिसर वगळता इतर ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. मराठवाड्यातील जाफराबादमध्ये 50 मिमी, भोकरदन, पाथरी, वाशीमध्ये 30 मिमी तर अहमदपूर 20 मिमी पाऊस झाला.

या जिल्ह्यांत पुढील तीन दिवस अतिवृष्टी.. हवामान खात्याने दिला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर बुधवारी मध्यरात्रीपासून ओसरला. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ, गडचिरोलीमध्येही अतिवृष्टी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर नाशिक आणि पुण्यामध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल. गडचिरोली जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी शुक्रवारपासून नऊ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातल्या शाळांना सुटी जाहीर केली आहे. अतिमहत्त्वाची कामे असल्यासच घराबाहेर पडावे, असाही इशारा देण्यात आला आहे.

Loading...

इतर बातम्या - उद्धव ठाकरेंच्या 'या' सूचक वक्तव्यामुळे पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच?

मुंबईत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारीदेखील मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, पुणे आणि कोल्हापुरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे हवामान खात्याकडून 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला होता तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. समुद्रात वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने मच्छिमारांना किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर मुंबईकरांनाही गरज पडल्यासच बाहेर पडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. खरंतर गेल्या काही दिवस पावसाने चांगलीच दडी मारली होती. पण राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या 8 सप्टेंबरपर्यंत बहुतांश भागात पाऊस असाच सक्रिया राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इतर बातम्या - बाप्पाची आरती ठरली अखेरची, 10 वर्षाच्या चिमुकल्याला...

SPECIAL REPORT : भुजबळ आणि सेनेत नेमकं ठरलंय काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2019 08:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...