मुंबईच्या 'या' एनजीओला मिळालं ब्रिटनच्या शाही लग्नाचं गिफ्ट

मुंबईच्या 'या' एनजीओला मिळालं ब्रिटनच्या शाही लग्नाचं गिफ्ट

लग्नात कोणाकडून काही भेटवस्तू घ्यायची नाही, असं ठरवलं होतं. पण उपस्थितांनी एनजीओंना मदत करावी, असं आवाहनही त्यांनी केलं. त्यासाठी जगातल्या ७ एनजीओंची नावं ठरवली होती.

  • Share this:

ब्रिटन, २० मे : ब्रिटिश राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मर्केल यांचा शाही विवाह शनिवारी थाटात झाला. लग्नात कोणाकडून काही भेटवस्तू घ्यायची नाही, असं ठरवलं होतं. पण उपस्थितांनी एनजीओंना मदत करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

त्यासाठी जगातल्या ७ एनजीओंची नावं ठरवली होती. अभिमानाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या मैना एनजीओची यासाठी निवड झाली. मैना फाऊंडेशन दर महिन्याला हजारो महिलांना सॅनेटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देते.

याशिवाय ब्रिटनमधल्या स्काॅटिश लिटिल सोल्जर, स्ट्रीट गेम्स, क्रायसिस फाऊंडेशन असे एनजीओजही आहेत. तसं ट्विट त्यांनी केलं.

या लग्नाला अभिनेत्री प्रियांका चोप्रा हजर होती.

 

 

 

First published: May 20, 2018, 10:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading