पुण्यात भजन करून कचराडेपो बंद आंदोलन

उरुळी देवाची ग्रामस्थांनी कचरा घेण्यास नकार दिला आहे. दररोज कीर्तन भजन ,जागरण गोंधळ अशा अनोख्या प्रकारे आंदोलन सुरू आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2017 03:40 PM IST

पुण्यात भजन करून कचराडेपो बंद आंदोलन

हलिमा कुरेशी,26 एप्रिल : पुणे शहरात जागोजागी कचरा साठल्याने दुर्गंधीबरोबरच अनेक आजार पसरत आहेत. शहरात स्वाइन्फ्लु वाढला आहे. त्यात कचरा साठल्याने भीषण परिस्थिती निर्माण झालीय. उरुळी देवाची ग्रामस्थांनी कचरा घेण्यास नकार दिला आहे. दररोज कीर्तन भजन ,जागरण गोंधळ अशा अनोख्या प्रकारे आंदोलन सुरू आहे.

अद्याप महानगरपालिका आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा होऊ शकली नाहीए. पर्यायी जागा निश्चित करण्यात प्रशासनाला अपयश आलंय. महानगरपालिकेत विरोधी पक्ष आक्रमक झाले असून लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केलीय.

पालिकेच्या कचरा प्रकल्पाची स्थितीदेखील अतिदक्षता विभागात असल्यासारखी आहे. 25 वर्षांपासून उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथे कचराडेपो आहे .यामुळे जमीन,जलस्रोत प्रदूषित झाले असल्याने , कायमचा कचराडेपो बंद आंदोलनावर काय उपाय काढला जातोय हे स्पष्ट होणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 03:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...