पुण्यात आणखी 5 पोलिसांना कोरोनाची लागण, आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

पुण्यात आणखी 5 पोलिसांना कोरोनाची लागण, आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

पुण्यात पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आल्यानंतर पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

पुणे, 28 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  कोरोनाशी लढा देण्यासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे. पुण्यात आज आणखी 5 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

पुण्यात जीवाची बाजी लावून कर्तृव्यावर असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पुण्यात आज आणखी 5 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.  पुणे पोलीस दलात आतापर्यंत 8 जण कोरोनाबाधित झाले आहे. या 8 ही पोलिसांच्या संपर्कात आलेले 100 हुन अधिक  पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

हेही वाचा - ...नाहीतर अनेक राज्य कोसळतील, सेनेनं करून दिली मोदींना राजकीय 'गुरू'ची आठवण

पुण्यात पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आल्यानंतर  पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी मोठा निर्णय घेतला आहे.  ज्या महिला पोलीस कर्मचारी गर्भवती आहे, त्यांना कोणत्याही बंदोबस्तात ड्युटी देण्यात येणार नाही.

दरम्यान, महाराष्ट्रात 27 एप्रिलपर्यंत तब्बल 107 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात 20 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 2 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 7 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

हेही वाचा - माणुसकी मेली? पोलिसाला धडक देऊन 'तो' थांबला नाही; बारामतीत घडली घटना

लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. लोकांनी घरातच राहावे, असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं होतं. परंतु, तरीही काही महाभाग हे रस्त्यावर फिरताना आढळले. त्यामुळे अशा तरुणांवर पोलिसांनी कारवाईही केली. मात्र, कारवाई करत असताना काही जणांनी पोलिसांवर हल्ला केला. राज्यात आतापर्यंत पोलिसांवर हल्ला करण्याच्या 150 घटना समोर आल्या आहे. या प्रकरणी  482 जणांना  अटक करण्यात आली आहे.

राज्यात आतापर्यंत 3 पोलिसांचा मृत्यू

दरम्यान, मुंबई आणि नवी मुंबईत कोरोनाची लागण होऊन दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.  25 एप्रिल रोजी मुंबईत कोरोनामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. मृत पोलीस कॉन्स्टेबल 57 वर्षांचे असून वाकोला पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. तर नवी मुंबईतील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराचा कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सोमवारी आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे पोलिसांचा मृतांचा आकडा 3 वर पोहोचला आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 28, 2020, 10:39 AM IST

ताज्या बातम्या