पीएनबी घोटाळ्यात गोकुळनाथ शेट्टीसह दोघांना अटक, घोटाळा एनडीएच्याच काळातला !

पीएनबी घोटाळ्यात गोकुळनाथ शेट्टीसह दोघांना अटक, घोटाळा एनडीएच्याच काळातला !

पीएनबी घोटाळ्यातली पहिली अटक कारवाई अखेर आज झालीय. पीएनबी बँकेचे उपाध्यक्ष आणि नीरव मोदी घोटाळ्यातला प्रमुख आरोपी गोकुळनाथ शेट्टी आज अखेर सीबीआयने अटक केलीय. मुंबईतून ही अटकेची कारवाई करण्यात आलीय.

  • Share this:

17 फेब्रुवारी, नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातली पहिली अटक कारवाई अखेर आज झालीय. पीएनबी बँकेचे उपाध्यक्ष आणि नीरव मोदी घोटाळ्यातला प्रमुख आरोपी गोकुळनाथ शेट्टी आज अखेर सीबीआयने अटक केलीय. त्याच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. हेमंत भट्ट आणि मनोज खरात अशी अटक करण्यात आलेल्या इतर दोघांची नावे आहेत.

मुंबईतून ही अटकेची कारवाई करण्यात आलीय. नीरव मोदीला लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवून देण्यात या गोपाळनाथ शेट्टीचाच मोठा हात असल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याची व्याप्ती 11,300 कोटींची आहे. दरम्यान, हायमड किंग नीरव मोदीचा पीएनबी घोटाळा हा २०१७ ते २०१८ दरम्यान म्हणजेच मोदी सरकारच्याच झाल्याचं सीबीआयच्या एफआयआरवरून स्पष्ट झालंय. नीरव मोदीचा ११ हजार कोटींचा घोटाळा यूपीएच्या कार्यकाळात २०११ मध्ये सुरू झाला होता, असा दावा भाजपकडून करण्यात येत होता. पण सीबीआयच्या एफआयआरमुळे भाजपच्या दाव्याला धक्का पोहचलाय. पंजाब नॅशनल बँकेच्या ज्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येतेये. ते सर्व अधिकारी २०१६ ते २०१८ दरम्यान सेवेत होते. दरम्यान या प्रकरणातला आरोपी गोकुलनाथ शेट्टीलाही आजच अटक करण्यात आलीय. यासोबतच हेमंत भट्ट आणि मनोज खरात या इतर दोन आरोपींनाही अटक करण्यात आलीय. सीबीआयनं शेट्टीच्या घरी धाड टाकली होती. त्याची पत्नी आणि भावाची चौकशीही करण्यात आलीये. दरम्यान पीएनबी घोटाळ्याच्या चौकशीसाठी मेहुल चौकसीशी संबंधीत २६ ठिकाणी सीबीआयनं धाडी टाकल्यात.

First published: February 17, 2018, 12:18 PM IST

ताज्या बातम्या