पिंपरी चिंचवड, 31 ऑगस्ट : पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये वारंवार गुन्ह्यांचे भयंकर प्रकार समोर येत असतात. आताही हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मित्रांसोबत दारू पित असताना झालेल्या वादातून मित्रांनी डोक्यात बेसिन घालून मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी परिसरातील हॉटेल खुशबूच्या पाठीमागे रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. मित्रांसोबत दारू पित असताना झालेल्या वादातून मित्रांनी मित्राचा खून केला आहे. या घटनेत शुभम साठे नामक 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.
महाविकास आघाडीचा वाद चव्हाट्यावर, ठाण्यात लागलेल्या बॅनरनं राजकीय खळबळ
शुभम साठे असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर कृष्णा भारत कापुरे, अजय मोहन क्षीरसागर आणि ज्ञानेश सुनील थोरात अशी तीन आरोपींची नावं आहेत. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; रविवारी रात्री शुभम आणि त्याचे मित्र पार्टीसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला असता तिघांनी शुभमच्या डोक्यात बेसिन घातलं. यामध्ये शुभमचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आला.
बहिणीच्या 13 दिवसांच्या लेकीला भावानेच संपवलं, कारण पाहून पोलीसही हैराण
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून शुभमचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर शुभमच्या अशा जाण्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
राज्यात पुढचे 24 तास हलका व मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान, पोलीस तीनही आरोपींची कसून चौकशी करत असून हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे शुभमच्या हत्येविषयी परिसरात खळबळ उडाली आहे.