Narendra Modi Biopic- हा अभिनेता साकारणार अमित शहांची भूमिका

Narendra Modi Biopic- हा अभिनेता साकारणार अमित शहांची भूमिका

काही दिवसांपूर्वी मोदींच्या पत्नी जसोदाबेद यांची भूमिका टीव्ही अभिनेत्री बरखा दत्त साकारणार असल्याचे स्पष्ट झालं होतं.

  • Share this:

गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची चर्चा सर्वत्र आहे. या सिनेमात विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी मोदींच्या पत्नी जसोदाबेद यांची भूमिका टीव्ही अभिनेत्री बरखा दत्त साकारणार असल्याचे स्पष्ट झालं होतं. आता भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भूमिका कोण साकारणार हेही समोर आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी या सिनेमात अमित शहा यांची भूमिका साकारणार आहेत. नुकतेच मनोज यांनी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली.

या सिनेमाबद्दल बोलताना मनोज म्हणाले की, ‘जेव्हा मला या व्यक्तिरेखेबद्दल विचारण्यात आलं तेव्हा हातात अन्य सिनेमे असूनसुद्धा मी या सिनेमाला होकार दिला. मी पहिल्यांदा एखाद्या जीवंत व्यक्तीची व्यक्तीरेखा मोठ्या पडद्यावर साकारत आहेत. लोकांमध्ये या सिनेमाची कमालीची उत्सुकता आहे. मला आनंद आहे की मी या सिनेमात अमित शहा यांची भूमिका साकारत आहे.’

मोहन म्हणाले की, राजकीय घडामोडींबद्दल ते नेहमी वाचत असतात. आपल्या देशात काय घडतं याबद्दल जागरुक असणं आवश्यक आहे. त्यांच्या मते, अमित शहा यांच्यात उत्तम संघटन कौशल्य आहे.

‘सध्या मी शहांची भाषणं ऐकत आहे आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सिनेमात फार गरज पडली तरच आम्ही मेकअप करू. जसं जसा सिनेमा पुढे सरकत जाईल तशी माझी वेगवेगळी हेअरस्टाइलही लोकांना पाहायला मिळेल,’ असं मनोज जोशी म्हणाले.

मन हेलावून टाकणारी घटना; एका क्षणात 7 वर्षाचा मोनिश कोसळला

First published: February 13, 2019, 2:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading