News18 Lokmat

Air Strike बद्दल भारतीय हवाई दलाचे आभार, मुलाचं नाव ठेवलं...

भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यानंतर काही वेळातच मुलाचा जन्म झाला.

News18 Lokmat | Updated On: Feb 28, 2019 11:04 AM IST

Air Strike बद्दल भारतीय हवाई दलाचे आभार, मुलाचं नाव ठेवलं...

जम्मू काश्मीरमधील पुलवामात 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 हून अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देताना भारताच्या हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.

26 फेब्रुवारीला पहाटे साडेतीन वाजता भारताच्या हवाई दलातील मिराज 2000 या लढाऊ विमानांनी जैश ए मोहम्मदच्या तळांवर बॉम्ब फेकले.

सुमारे 1 हजार किलो वजनाच्या बॉम्ब हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा दहशतवादी तळ असलेल्या ठिकाणची अल्फा 3 कंट्रोल रूम उद्ध्वस्त झाली.

Loading...

भारताच्या 12 मिराज विमानांनी ही कामगिरी केली. यात जवळपास 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती नाही. यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरचाही समावेश आहे.

एअर स्ट्राईक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्याचे समजल्यानंतर देशभर आनंदाचं वातावरण निर्माण झालं. अनेकांनी गोड मिठाई वाटून आनंद साजरा केला.

राजस्थानातील एका दाम्पत्याने मात्र अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला. हवाई दलाच्या कामगिरीची आठवण म्हणून मुलाचे नाव मिराज असं ठेवलं. पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्याबद्दल त्यांनी हवाई दलाचं आभारही मानलं.

ज्या मिराजने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यानंतर काही वेळातच मुलाचा जन्म झाला. म्हणून मुलाचं नाव मिराज असं ठेवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 11:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...