Home /News /news /

VIDEO : शेतातील गारा हातात घेऊन सुन्न होऊन पाहत राहिला बळीराजा; महिलेच्या आवाजाने हृदय पिळवटून निघेल

VIDEO : शेतातील गारा हातात घेऊन सुन्न होऊन पाहत राहिला बळीराजा; महिलेच्या आवाजाने हृदय पिळवटून निघेल

Shocking Video : यंदा पिकं चांगली आली की डोक्यावरचं कर्ज कमी करू किंवा मुलीचं लग्न करू..शेतकऱ्यांच्या सर्व स्वप्नांची या गारपीटामुळे राखरांगोळी झाली.

  भोपाळ, 9 जानेवारी : मध्य प्रदेशात (Madhya Pradesh News) 25 जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊसामुळे ( Untimely rain and hail) जनजीवन विस्कळीत झालं आहे. गारपीट आणि अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका हा तेथील शेतकऱ्यांना बसला आहे. मध्य प्रदेशातील काही भागात तर शेतात बर्फ पडल्याचंही दिसून येत आहे. या घटनेचा काही व्हिडीओ (Video Viral On Social Media) सोशल मीडियावरुन समोर येत आहे. हे पाहून आपल्या पायाखालची जमिन सरकेल. हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (In many districts of Madhya Pradesh hailstorm has caused huge losses to farmers) शेतातील पिकांवर जेव्हा फुलं येऊ लागतात तेव्हा त्यावर पावसामुळे नुकसान होते. मात्र येथे तर गारपीट होत असल्याने पिकं उद्ध्वस्त झाली आहे. शहरांमध्ये मात्र आपण या थंडीचा आनंद घेत असताना रविवारी बुंदेलखंडच्या या महिलेच्या रडण्याच्या आवाजाने नागरिक झोपेतून जागे झाले. अशा प्रकारची पोस्ट एका व्यक्तीने शेअर करून मध्य प्रदेशातील भीषण वास्तव लोकांसमोर आणलं. हे ही वाचा-छापेमारीदरम्यान Income Tax अधिकारी हैराण, हेअर ड्रायरने वाळवली 1 कोटींची कॅश विरेंद्र तिवारी नावाच्या व्यक्तीने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ही महिला शेतातील अवस्था पाहून धायमोकलून रडताना दिसत आहे. या पोस्टमध्ये त्याने शेतकऱ्यांची खरी अवस्था दाखवली. यात तो म्हणतो की, शेतकऱ्यांना सरकारकडून जी मदत दिली जाते, त्यात तर धान्यदेखील येत नाही. तर निसर्गाच्या प्रकोपामुळे होणारं हे नुकसान कसं भरून निघणार?
  मध्य प्रदेशातील 25 जिल्ह्यात अवकाळी पाऊस भोपाळच्या हवामान केंद्रानुसार सागर, दमोह, छतरपुर, टीकमगढ़, निवाड़ी, पन्ना, उज्जैन, देवास, आगर मालवा, शाजापुर, रतलाम, मंदसौर, नीमच, ग्वालेर, शिवपुरी, गुना, अशोकनगर, दतिया, मुरैना, भिंड, श्योपुर, राजगढ़, रायसेन आणि छिंदवाड़ा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागत आहे. शेतातील पिकांची अवस्था पाहून अनेकांना तर रडू कोसळलं आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Farmer, Madhya pradesh

  पुढील बातम्या