मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

‘लॉकडाऊन’मध्ये चोरांचा दारुंच्या दुकानांवर डोळा, 2 दिवसांमध्ये फोडली 3 दुकाने

‘लॉकडाऊन’मध्ये चोरांचा दारुंच्या दुकानांवर डोळा, 2 दिवसांमध्ये फोडली 3 दुकाने

तुम्हाला हिरड्यांशी निगडीत काही आजार आहेत का? एक ग्लास वाइन तुमच्या दातातील किटाणू आणि तोंडात होणाऱ्या बॅक्टेरिया तसेच पॅथोजन्सला संपवण्याचं काम करतात.

तुम्हाला हिरड्यांशी निगडीत काही आजार आहेत का? एक ग्लास वाइन तुमच्या दातातील किटाणू आणि तोंडात होणाऱ्या बॅक्टेरिया तसेच पॅथोजन्सला संपवण्याचं काम करतात.

या घटनांमागे सराईत चोरट्यांचा हात आहे की लॉकडाऊन मुळे दारू मिळत नसल्याने तळीरामांनीच हे कृत्य केलं याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

जालना 14 एप्रिल: लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार बंद आहेत. सगळा देश घरात बंद आहे. मात्र या काळात दारुचं व्यसन असणाऱ्यांना प्रचंड त्रास होतोय. ज्यांना दररोज घ्यायची सवय आहे अशा लोकांना अस्वस्थ होत आहे. वाट्टेल त्या ठिकाणांवरून ते दारू मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांसाठी चोरटे सक्रिय झाले असून बंदच्या काळातही त्यांचा डोळा दारुंच्या दुकानांवर आहे. जालन्यात गेल्या 2 दिवसांमध्ये तब्बल 3 दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. आणि गोदाम फोडून सुमारे 10 लाखाची दारू लंपास करण्यात आली. ज्यामध्ये जामवाडी येथील दारूचं एक गोदाम फोडून साडे आठ लाखांची दारू लंपास करण्यात आली. तर चंदनझीरा परिसरातील एक बार फोडून सुमारे पावणे 2 लाखांच्या विदेशी दारूवर हात साफ करण्यात आला. तर मंगल बाजारातील एक देशी दारूची दुकान फोडून चोरी झाल्याचे समोर आलं आहे. या घटनांमागे सराईत चोरट्यांचा हात आहे की लॉकडाऊन मुळे दारू मिळत नसल्याने तळीरामांनीच हे कृत्य केलं याचा शोध आता पोलीस घेत आहेत. प्रसिद्ध निर्मात्याची दुसरी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, याआधी आला होता हार्टअटॅक संपूर्ण देश 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातील सर्व नागरिकांना 3 मेपर्यंत नियमांचं पालन करावं लागणार आहे. या दिवसांमध्ये सगळ्यांना खूप काळजी घ्यावी लागणार असल्याचंही मोदी म्हणाले. दरम्यान, काही राज्यांनी आधीच 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. पण आता मोदींनी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राला धोका, कोरोना मृत्यूंमध्ये प्रत्येक दुसरा रुग्ण महाराष्ट्रातला मोदी काय म्हणाले? - भारताची लढाई मोठ्या हिम्मतीने सुरू आहे. नागरिकांच्या त्यागामुळे कोरोनामुळो होणाऱ्या नुकसानीला बऱ्यापैकी आवरण्यात यशस्वी झालो आहोत. - तुम्हाला होणाऱ्या त्रासाची मला कल्पना आहे. कोणाला अन्न नाही, प्रवासी अडकले, पण तरी तुम्ही आपले कर्तव्य सोडले नाही. - प्रत्येकजण सैनिकाप्रमाणे कर्तव्य बजावत आहात. मी तुम्हाला आदरपूर्वक सलाम करतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो - आंबेडकरांना देशाने संयमाद्वारे श्रद्धांजली वाहिली - लोकांचा हाच संयम प्रेरणादायी आहे - आपल्या देशात कोरोना येण्याआधीच एअरपोर्टवर लोकांची स्क्रिनिंग सुरू करण्यात आली - आपल्या देशात 550 रुग्ण होते तेव्हा भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला - समस्या दिसली तेव्हाच आपण उपाययोजना केल्या
Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Wine shop

पुढील बातम्या