मुंबई, 31 ऑगस्ट : राज्यात कोरोनाच्या संकटात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोसळली होती. पण अशात अनेक विरोध आणि समर्थनार्थ राज्यात दारू विक्रीला परवाणगी देण्यात आली. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला तळीरामांचा आधार मिळाला असंच म्हणावं लागणार आहे. कोरोना काळात रोजगार बुडाला त्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली पण एकीकडे ही परिस्थिती मद्य विक्रीमुळे सुधारली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 4 महिन्यात राज्यात 1509 लिटर मद्य विक्री झाली आहे. यातून राज्य सरकारला तब्बल 2362 कोटींचा महसूल मिळाला आहे. मद्य विक्रीतमुळे कोटीच्या कोटी उड्डाणं घेत तब्बल 3900 कोटींची मद्य विक्री झाली आहे. यामध्ये 682 कोटींची देशी दारू तर 1568 कोटींचं विदेशी मद्य तर 111 कोटींच्या बीयर विक्रीतून महसूल मिळाला आहे.
Unlock 4.0 साठी असे असतील राज्य सरकारचे नियम, 'या' ठिकाणी मिळू शकते सूट
अशात, आता राज्य अनलॉकच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय आणि उद्योग सुरू झाले आहे. अशात आता बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्याही वाढली आहे. पण त्यातून कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
SSR Case: आज रियाचा आणखी एक धक्कादायक चॅट उघड, CBI चौकशीत झाला मोठा खुलासा
एकीकडे राज्य अनलॉक -4 च्या टप्प्यात आहे तर दुसरीकडे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्क्यांवर कायम आहे. राज्यात 2 लाख 93 हजार 548 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.