कोकणात गणेशोत्सवाला गालबोट, बाप्पाला निरोप देताना 3 जण बुडाले

कोकणात गणेशोत्सवाला गालबोट, बाप्पाला निरोप देताना 3 जण बुडाले

कोरोनामुळे अतिशय साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा होत आहे. विसर्जन सुद्धा अतिशय साध्या पद्धतीने करावे अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या.

  • Share this:

रत्नागिरी, 24 ऑगस्ट : कोरोनाच्या परिस्थितीत सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात पोहोचलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणेश विसर्जनाला  गालबोट लागले असून जिल्ह्यामध्ये तीन जण विसर्जन करताना बुडाली आहे.

यामध्ये रत्नागिरीजवळील टाकळी येथे काजळी खाडीत गणपती विसर्जन करताना सत्यवान पिलांकर 48 वर्ष व विशाल दिनकर वय 28 हे दोघेजण बुडाले होते.  स्थानिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते खाडीमध्ये वाहून गेले. त्यामुळे उशिरापर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता.

तसंच दीड दिवसांचा गणेश विसर्जनाच्या वेळी मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे विसर्जन करतेवेळी 28 वर्षांचा युवक बुडाला व बेपत्ता झाला. या युवकाचे नाव अविनाश शिगवण असे आहे. हा प्रकार गदा पुलानजीक घडला युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र, अजूनही तो आढळून आला नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गणेश विसर्जन करताना तीन जण बुडाली आहेत. मात्र, अजून पर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे ते जिवंत आहेत की त्यांचा मृत्यू झाला याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. बेपत्ता तरुणांचे शोध कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, सकाळपर्यंत कुठेही ते आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे.

यावर्षी कोरोनामुळे अतिशय साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा होत आहे. विसर्जन सुद्धा अतिशय साध्या पद्धतीने करावे अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. परंतु, कृत्रिम ठिकाणी विसर्जन न करता सालाबाद प्रमाणे हाडी नदी व तलावात विसर्जन ग्रामीण भागात करण्यात येत होते त्यातूनच हा प्रकार घडला आहे.

Published by: sachin Salve
First published: August 24, 2020, 10:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या