कोल्हापूर, 10 मार्च : कोल्हापुरात कन्नडच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक होत असल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी व्यावसायिकांना आव्हान दिलं आहे. यापुढे कोल्हापूर जिल्ह्यात एकही कन्नडचा बोर्ड दिसला तर त्यावर शिवसेना स्टाइल कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. (Kolhapur - Shiv Sena aggressive over Kannada board )
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कानडीचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा कर्नाटकात जाळण्यात आल्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी कोल्हापूरमधील एका थिएटरमध्ये घुसून कन्नड चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला होता. या प्रकरणात शिवसैनिकांनी भीमाशंकर यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढल्यानंतर संतप्त झालेल्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील दुकानांवर असलेले मराठी फलक तोडले होते. त्यानंतर आता शिवसैनिकांनी कोल्हापूरातील कन्नड बोर्डावर काळ फासलं आहे.
हे ही वाचा-'बेळगावला शक्य, मग महाराष्ट्राला का नाही?' कोल्हापूरकरांचा ठाकरे सरकारला सवाल
माझ्या व्यवसाय होत नाही, ग्राहकांना कळायला हवं म्हणून अनेक व्यावसायिकांनी कन्नड बोर्ड लावले होते. यावर शिवसैनिक चांगलेचं संतापले. आणि यापुढे कोल्हापुरात एकही कन्नड बोर्ड दिसला तर त्यांना शिवसेना स्टाइलने समाचार घेतला जाईल, असा इशारा दिला आहे. जर त्यांनी कन्नड बोर्ड लावले तर व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल, असाही इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी व्यावसायिकांना दम देत मराठी बोर्ड लावण्याचा आग्रह धरला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.