Home /News /news /

राज्यात आणखी एका जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन शिथिल, उद्यापासून नियम असे असतील नियम

राज्यात आणखी एका जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन शिथिल, उद्यापासून नियम असे असतील नियम

राज्य अनलॉक होत असून आता अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन काढण्यात आलं असून काही ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत.

    कोल्हापूर, 26 जुलै : राज्यात कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण सध्या राज्य अनलॉक होत असून आता अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन काढण्यात आलं असून काही ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत. कोल्हापूरमध्ये उद्यापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे दूध संकलन आणि वाहतूक सुरळीत होणार आहे. किराणा दुकान सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दूरध्वनी इंटरनेट आणि बँक एटीएम सुरू राहणार आहेत. या दरम्यान नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे नियम काटेकोरपणे पाळणं बंधनकारक असणार आहे. कारगिल विजय दिवशीच महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण, काश्मीर खोऱ्यात गमावला प्राण अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तरुणाने दिला संदेश, सगळ्यांनी दिल्या शुभेच्छा कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगधंदे पन्नास टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहणार आहेत. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतीची कामे सुरू राहणार आहेत. जिल्ह्यामध्ये साखरपुडा लग्न मुंज वाढदिवस या कार्यक्रमांना बंदी असेल. अंत्यसंस्कार आणि अंत्ययात्रेसाठी दहा नातेवाईकांची परवानगी आहेत तर जिल्ह्यातील शिव भोजन थाली सुरू राहणार असल्याची महत्त्वाची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील किरकोळ दूध विक्री सुरू राहणार आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत जिल्ह्यामधील हॉटेल वगळून लॉज रेस्टॉरंट केस कर्तनालय, ब्युटी पार्लर, सलून, मसाज सेंटर, किराणा धान्य विक्री केंद्र बंद राहणार आहेत. दुचाकीवर फक्त एक चालकांन चारचाकी वाहनांमध्ये तीन प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या