S M L

नगर एसपी कार्यालय तोडफोड प्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांच्या हत्येनंतर अहमदनगरमधली राजकीय गुंडगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. साम दाम आणि दंड या नीतीचा वापर करून विरोधकांचा काटा काढण्याचं हे तंत्र नगर जिल्ह्यात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आत्मसात केलं.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 9, 2018 10:43 AM IST

नगर एसपी कार्यालय तोडफोड प्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक

अहमदनगर,09 एप्रिल :  केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर आमदार समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केली. त्याप्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना आज सकाळी अटक करण्यात आली असून दुपारी न्यायालयात हजर करण्यात येईल, त्यांना जमीन होतो की पोलीस कोठडी या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे, केडगाव हत्या प्रकरणातही आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव असल्याने पोलीस काय भूमिका घेताय हे पहावे लागेल.

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांच्या हत्येनंतर अहमदनगरमधली राजकीय गुंडगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. साम दाम आणि दंड या नीतीचा वापर करून विरोधकांचा काटा काढण्याचं हे तंत्र नगर जिल्ह्यात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आत्मसात केलं. त्याचा भीषण रूप म्हणजे हे हत्याकांड असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.

आपल्या फायद्यासाठी या सर्वपक्षीय नेत्यांनी गुंडा पुंडांना हाताशी धरून त्यांना मोठं केलं. यातून राजकीय गुन्हेगारीची नवी संस्कृती या जिल्ह्यात जन्माला आली आणि आता त्यावर कोणाचच नियंत्रण राहिलं नाही. या सगळ्या गुंडगिरीला पोलिसही तेवढेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप राज्याचे ज्येष्ठ मंत्री रामदास कदम यांनी करून खुद्द मुख्यमंत्र्यांवरच निशाना साधलाय.आत्तापर्यंत काय झाली कारवाई?

शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्येप्रकरणी अटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार संग्राम जगताप यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भानुदास कोतकर आणि माजी महापौर संदिप कोतकर यांच्या विरूद्ध गुन्हे दाखल

Loading...
Loading...

यासोबतच पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 22 जणांना 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये.

 

आज काय घडलं नगरमध्ये?

रामदास कदम - 

अहमदनगरमधल्या दहशतीला भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं असल्यानं सर्व जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांची आहे असंही ते म्हणाले. शिवसैनिकांच्या हत्येनं परिस्थिती स्फोटक बनलेली असताना रामदास कदम यांनी आज अहमदनगरला भेट देऊन त्या दोन शिवसैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं.

नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. गेली अनेक वर्ष अहमदनगरमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं गुंडगिरी पोसली आहे. या पक्षांच्या नेत्यांचे व्यावसायिक आणि कौटुंबिक संबंध असून त्यातूनच ही दहशत तयार झाली असा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काही पोलिस अधिकारी गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली. दोनही शिवसैनिकांच्या कुटूंबियांची सर्व जबाबदारी शिवसेना घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दीपक केसरकर -

गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनीही नगरमध्ये जावून परिस्थितीचा आढावा घेतला. कुठल्याही परिस्थितीत दोषींना सोडणार नाही असं  आश्वासन त्यांनी दिलं. पोलिस अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

राम शिंदे -

जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नि:पक्ष चौकशी करून गुन्हेगारांना शासन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं.

राधाकृष्ण विखे पाटील - 

नगरच्या प्रकरणाची नि:क्षपाती चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीये... राजकारणात गुन्हेगारी वाढलीये.. कोणत्याही गुन्हेगाराला पाठिशी घातलं जावू नये.. त्याचबरोबर राजकीय सुडबुद्धीतून कारवाई नको असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2018 07:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close