कर्नाटकातील काँग्रेस – जेडीएसमधील वादाचा फायदा भाजपला?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस - जेडीएस कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 12:34 PM IST

कर्नाटकातील काँग्रेस – जेडीएसमधील वादाचा फायदा भाजपला?

बंगळूरू, 14 एप्रिल : विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस – जेडीएसनं एकत्र येत सत्ता स्थापन केली. कमी आमदार असताना देखील काँग्रेसनं केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. लोकसभेकरता देखील काँग्रेस – जेडीएसनं मैत्री केली आहे. पण, कार्यकर्ते मात्र मैत्रिपूर्ण लढतीसाठी तयार नाहीत. त्यांच्या मनात अद्यापही कटुता आहे.  भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस - जेडीएस एकत्र आले. पण, कार्यकर्ते मात्र वेगळ्याच विचारात आहेत. त्यांनी परस्परांना सहकार्य करायचं नाही असं ठरवलं आहे. परिणामी, काँग्रेस – जेडीएसला याचा फटका बसून भाजपला फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, निकालाअंती काँग्रेस – जेडीएसनं परस्परांना मदत केली की नाही? ही बाब स्पष्ट होईल.


भाजपला धक्का

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला होता. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. काँग्रेसनं भाजपवर दडपशाहीचा आरोप केला होता. पण, त्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता देखील स्थापन केली होती. पण, लोकसभा निवडणुकीकरता मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंडाचं हत्यार उपसल्याचं चित्र आहे.


Loading...

माढ्यातील मोदींची सभा रद्द होणार? काँग्रेसने विरोध करण्यामागे दिलं 'हे' कारण


विरोधकांची एकी

भाजपविरोधकांनी लोकसभेकरता एकत्र येत भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही राज्यांमध्ये भाजपनं देखील मित्र पक्षांसोबत युती केली आहे. निवडणूक पूर्व सर्व्हेक्षणामध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही अशी आकडेवारी समोर येत आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये देखील 2014 प्रमाणे जागा जिंकता येणार नाहीत अशी आकडेवारी आहे. त्यामुळे भाजपनं आता इतर राज्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे कर्नाटकमध्य़े दोन मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फायदा होऊ शकतो.


VIDEO : अन् रणजितसिंह मोहिते पाटील पक्षच विसरले, भाजपच्या सभेत केली चूक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 12:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...