Home /News /news /

कोरोनाच्या संकटात नोकरी गेल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल, चिमुकलीला संपवून दांपत्याची आत्महत्या

कोरोनाच्या संकटात नोकरी गेल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल, चिमुकलीला संपवून दांपत्याची आत्महत्या

जगात एकूण होणाऱ्या मृत्यूंमध्ये आत्महत्यांचं प्रमाण 1.4% आहे. त्याचबरोबर ग्रीनलँड, दक्षिण कोरिया आणि कतारमध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर अभ्यानुसार, भारतातही आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

जगात एकूण होणाऱ्या मृत्यूंमध्ये आत्महत्यांचं प्रमाण 1.4% आहे. त्याचबरोबर ग्रीनलँड, दक्षिण कोरिया आणि कतारमध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर अभ्यानुसार, भारतातही आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

आत्महतेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावर धाव धेतली. घटनास्थळावर पोलिसांना एका सुसाईड नोट मिळाली आहे.

नवी दिल्ली, 26 जुलै : करोनाच्या काळात अनेक कामं बंद असल्यामुळे मजूरांची परवड झाली. आर्थिक फटका बसल्यामुळे सगळ्याच क्षेत्रातील मजूरांचे रोजगार गमवले तर काही गमवण्याच्या भीतीत आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटांचा सामना करताना नोकरी जाण्याच्या भीतीनं कर्नाटकमधील दाम्पत्यानं आपल्या मुलीला संपवलं आणि नंतर आत्महत्या केली. आत्महतेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावर धाव धेतली. घटनास्थळावर पोलिसांना एका सुसाईड नोट मिळाली आहे. दरम्यान तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धारवाडमध्ये कोरोनाच्या संकटात संपूर्ण कुटुंबाचं संपलं आहे. यामध्ये एक जोडपं आणि त्यांची मुलगी यांचा समावेश आहे. तिघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संकटामध्ये नोकरी केली यामुळे आर्थिक अडणींखाली तिघांनी आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. मुंबईचे होणार का वांदे? विमानाचं तिकीट देऊनही मजुरांचा परतायला नकार खरंतर, भारतातील कोरोना (India coronavirus) रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. 24 तासांत तब्बल 48 हजार 661 नवीन रुग्ण सापडले. तर 705 जणांचा मृत्यू झाला. मात्र यात दिलासादायक बातमी म्हणजे जितका कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे, तितकंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढतं आहे. भारतात एकाच दिवसात सर्वात जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशात 24 तासांत 64% रुग्ण बरे झालेत अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 36,000 पेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांचा वाढत आकडा पाहून घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनाला हरवणं शक्य आहे, हे या रिकव्हरी रेटवरून दिसून येतं. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 85 हजार 522 झाली आहे. यातील 4 लाख 67 हजार 882 रुग्ण सक्रीय आहेत. तर, 8 लाख 85 हजार 577 रुग्ण निरोगी झाले आहेत. 32 हजार 063 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या