भाविकांवर काळाचा घाला, बस अपघातात 11 जणांचा मृत्यू

भाविकांवर काळाचा घाला, बस अपघातात 11 जणांचा मृत्यू

Bus Accident : बस अपघातात 11 भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

  • Share this:

रांची, 10 जून : झारखंडहून बिहारला जाणाऱ्या बसला अपघात झाल्यानं 11 भाविकांचा मृत्यू झाला आहे. महाराणी ट्रॅव्हल्सच्या बसनं हे भाविक प्रवास करत होते. यावेळी त्यांच्यावर काळानं घाला घातला. झारखंडमधून बिहारला जात असताना बसला अपघात झाला. चंपारणमधील जीटी रोड घाटीजवळ सोमवारी ( आज ) पहाटे हा अपघात झाला. यामध्ये 11 भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नऊ भाविकांचा मृत्यू हा अपघातस्थळी झाला. तर, दोन भाविकांना उपचारादरम्यान आपला जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत मदतीला सुरूवात केली.

अपघातामध्ये मृत्यू पडलेल्या भाविकांमध्ये बिहारच्या भाविकांची संख्या जास्त आहे. गंभीर जखमी भाविकांनी इतरत्र हलवण्यात आलं आहे. दरम्यान बसमध्ये काही लोक अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते? याबद्दल ठोस असा आकडा अद्याप समोर आलेला नाही.

VIDEO : मुंबईच्या रस्त्यावर स्टंट करत मद्यपींचा धुमाकूळ

First published: June 10, 2019, 11:51 AM IST
Tags: accident

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading