युद्धाची धमकी देणाऱ्या पाककडे पंतप्रधान कार्यालयाच्या विजेचे बिल भरण्यास पैसे नाही!

भारताला युद्धाची धमकी देणाऱ्या इम्रान खान यांच्याकडे स्वत:च्या कार्यालयाच्या विजेचे बिल भरण्यास देखील पैसे नाहीत.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 05:55 PM IST

युद्धाची धमकी देणाऱ्या पाककडे पंतप्रधान कार्यालयाच्या विजेचे बिल भरण्यास पैसे नाही!

इस्लामाबाद, 29 ऑगस्ट: दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या पाकिस्तानची अवस्था दिवसेदिवस बिकट होत चालली आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्ज घेऊन त्याचे व्याज देण्यासही पैसे नसलेल्या पाकिस्तानला कोणी आर्थिक मदत देण्यास तयार नाही. ही परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की आता पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाच्या वीजेचे बिल भरण्यास पैसे नाहीत. भारताने काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. इतक नव्हे तर भारताला अण्विक युद्धाची धमकी देखील दिली. पण ज्या इम्रान खान यांनी ही धमकी दिली त्यांच्याकडे स्वत:च्या कार्यालयाचे वीजेचे बिल भरण्यास देखील पैसे नाहीत.

पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाचे बिल न भरल्याने इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीने PMO कार्यालयाला वीजेची जोडणी तोडण्याची नोटीस पाठवली आहे. एक्स्प्रेस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या PMOने 41 लाख 13 हजार 992 रुपयांचे वीजेचे बिल भरले नाही. गेल्या महिन्याचे कार्यालयाचे बिल 35 लाखाहून अधिक आले आहे. त्याआधीच्या महिन्याचे 5 लाख 58 हजार बिल देखील भरण्यात आलेले नाही. इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाक PMOकडून वीजेचे बिल नियमीतपणे भरले जात नाही. कधी बिल भरले जाते किंवा अनेक महिने बिलाची रक्कम थकवली जाते. आता बिलाची इतकी मोठी रक्कम न भरल्यामुळे कंपनीने थेट पंतप्रधान कार्यालयाला नोटीस बजावली आहे.

नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली. पाकने प्रथम काश्मीर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय करण्याचा प्रयत्न केला. पण संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत त्यांची कोणीही दखल घेतली नाही. अमेरिकेने देखील काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधांनी थेट भारताला यु्द्धाची धमकी दिली. पंतप्रधानांच्या पाठोपाठ त्यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी देखील युद्धाची धमकी दिली. हे सर्व कमी पडले म्हणून की काय रेल्वे मंत्र्यांनी युद्धाची वेळ देखील जाहीर करून टाकली.

पाकिस्तानात हाहाकार! इथे सोन्याची किंमत पाहून तुमचे डोळे होतील पांढरे

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार एका तोळ्याची किंमत 90 हजार रुपये झाली आहे. मागच्या एक महिन्यात इथे सोनं 12 हजार 840 रुपयांनी वाढलं आहे. भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 39 हजार 970 रुपये आहे. म्हणजेच पाकिस्तानात सोन्याची किंमत भारताच्या दुप्पट आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढल्यामुळे पाकिस्तानातही हे भाव वाढले आहेत. सोन्याचे भाव असेच वाढत राहिले तर इथे सोन्याचा भाव 1 लाखापर्यंत जाऊ शकतो.

Loading...

टोल नाक्यावर महिला कर्मचाऱ्याला मारहाण, संतापजनक VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...