बेस्ट संपावर येणार कोर्टाचा निकाल, या आहेत आजच्या महत्त्वाच्या बतम्या

बेस्ट संपावर येणार कोर्टाचा निकाल, या आहेत आजच्या महत्त्वाच्या बतम्या

  • Share this:


  • बेस्ट संपांचा आज सातवा दिवस आहे. तोडगा न निघाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या प्रकरणात उच्च न्यायालयात सुनावणी. सुरू असून हायकोर्ट काय निर्णय देतो यावर संपाचं भविष्य अवलबूंन आहे.

  • बेस्ट चा संप सुरू असतानाच ओला आणि उबर चालकांनीही संपाचा इशारा दिलाय. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही असा या चालकांचा आरोप आहे.

  • बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच्या चित्रपटाचं आज खास स्क्रिनिंग होणार आहे. शरद पवार हा चित्रपट पाहणार आहेत. यावर शरद पवारांची काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

  • समाजवादी पक्षासोबत आघाडी केल्यानंतर मायावतींना भेटण्यासाठी राजदचे नेते तेजस्वी यादव आज लखनौत येत आहेत. राजदही या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2019 07:14 AM IST

ताज्या बातम्या