शिवसेनेच्या बैठकीत काय होणार? या आहेत महत्त्वाच्या बातम्या
भाजपचे अमित शहांनी रविवारी कलेल्या भाषणाचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. त्या वक्तव्यावर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी बदलत्या राजकीय
भाजपचे अमित शहांनी रविवारी कलेल्या भाषणाचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. त्या वक्तव्यावर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी बदलत्या राजकीय
परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अमित शहांच्या वक्तव्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज नांदेडमध्ये असून ते गुरुव्दारात जाऊन दर्शन घेणार आहेत. शिवसेनेने त्यांच्या वक्व्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्याने ते काय बोलतील याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.
बेस्टच्या कामगार संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. त्याबाबत सोमवारी दुपारी महत्त्वाची बैठक आहे. त्यात आंदोलनाची रुपरेषा ठरवली जाणार आहे.
संसदेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवशनात राफेल चा मुद्दा आजही उपस्थित होण्याची शक्यता असून गोंधळा कामकाज वाहून जाणार असेच सकेत आहेत.