मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, राज्यपालांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक

मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, राज्यपालांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महत्त्वाची बैठक होत आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. आता भेटीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त सदस्य प्रकरणावरून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यातच अलीकडे खुद्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुचना दिल्या होत्या. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गैरहजर राहिले होते. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद निर्माण झाला आहे. एवढंच नाहीतर राज्यपालांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा - पहिलं कोरोना वॅक्सिन ज्याचं 100 रुग्णांवर झालं ट्रायल, वाचा काय आला रिझल्ट

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महत्त्वाची बैठक होत आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, गृह मंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता उपस्थित आहेत.

या बैठकीत कोरोना संदर्भातील उपाय योजना आणि सध्या राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी राज्यपाल आणि सरकारमध्ये कोणताही तणाव नाही, असं सांगितलं.

तसंच, 'राज्यपाल सरकारवर नाराज आहे, असे प्रश्न विचारले जात आहे. मुळात राज्यपाल आणि सरकारचे संबंध गोड आहेत. राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध हे चांगले आहेत. त्यांचे संबंध हे एखाद्या पिता पुत्राप्रमाणे आहे' अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

हेही वाचा -राज्यपालांच्या भेटीनंतर संजय राऊत यांची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले...

मंत्री उदय सामंत यांच्या निर्णयाबद्दल राज्यपालांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यावर संजय राऊत म्हणाले की,  'उदय सामंत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी अजून निर्णय घेतला नाही. राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती आहे. त्यामुळे ते इतर मंत्र्यांसोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतली' असं राऊत यांनी सांगितलं.

संपादन - सचिन साळवे

First published: May 23, 2020, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading