राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक

या बैठकीत आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जुलै : राज्यात कोरोना व्हायरसशी सामना करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या दिवसांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वासात न घेता निर्णय घेतात, अशी तक्रार काही नेत्यांनी  शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीला महत्त्वप्राप्त झाले आहे.

मराठी तरुणांसाठी ठाकरे सरकारचे मोठे पाऊल, महाजॉब्स वेबपोर्टल झाले लाँच

एवढंच नाहीतर राज्यात जुलै महिन्यापर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा झाल्यानंतर  मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे घरापासून दोन किलोमीटर परिघातच प्रवास मुभा देण्यात यावी असं मुंबई पोलिसांचं म्हणणं होतं. पण यावर नागरिकांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने ही अट मागे घेतली.

दोन किलोमीटर अंतरातच मुंबईकरांनी प्रवास करावा या मुंबई पोलिसांच्या आदेशावरही शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ती तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर या निर्णयावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही आक्षेप घेतला होता.

शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर  पोलीस आयुक्तांनी दोन किलोमीटर परिघातच प्रवास मुभा हा नियम रद्द करून घराजवळच खरेदी करा, असं आवाहन नागरिकांना केले.

...तर मुख्यमंत्र्यांनी मला यातून मुक्त करावे, काँग्रेस मंत्र्याच्या मागणीने खळबळ

दरम्यान,  महाविकास आघाडीचे शरद पवार हे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे त्यांच्याच पुढाकाराने ठाकरेंपुढे ही नाराजी उघड केली जाण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या अर्थविकासाच्या दृष्टीने व्यवहार खुले करण्याच्या विचारात होते. पण उद्धव ठाकरे सरकारने मात्र त्यांना विश्वासात न घेताच लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये काय होतं हे पाहावं लागणार आहे.

संपादन - सचिन साळवे

Published by: sachin Salve
First published: July 6, 2020, 4:01 PM IST

ताज्या बातम्या