यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, हवामान खात्याचा अंदाज

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, हवामान खात्याचा अंदाज

यंदा 100 टक्के पाऊस पडेल असा हवामान खात्याने सांगितलं आहे.

  • Share this:

10 मे : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा 100 टक्के पाऊस पडेल असा हवामान खात्याने सांगितलं आहे.

अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यंदा देशात सरासरीहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा सुधारित अंदाज हवामान खात्याने मंगळवारी वर्तविला आहे.

आधीच्या अंदाजानुसार 96 टक्के पावसाचं भाकित करण्यात आलं होतं. दरम्यान, एल निनोचा प्रभाव कमी राहण्याचा अंदाज असल्यानं पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच, जवळपास 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या 50 वर्षांतील पावसाची सरासरी 89 सेंमी गृहीत धरून त्याच्या तुलनेत पावसाचा कमी, जास्त किंवा सरासरीएवढा असा अंदाज वर्तविण्याची पद्धत आहे. यातही वर्तविलेल्या अंदाजाहून 5 टक्के कमी-जास्त पाऊस होण्याची शक्यता असते.

दरम्यान, हवामान विभागाच्या चांगल्या पावसाच्या अंदाजानंतर आता शेअर बाजारानंही उसळी घेतली आहे. आज बाजार उघडताच शेअर बाजार 160 अंकांनी वधारला आणि त्यानं 30 हजारांचा टप्पा पार केला. चांगल्या पावसाच्या या बातमीमुळं बाजारात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2017 03:18 PM IST

ताज्या बातम्या