पुण्यात झाडांची कत्तल,पुणेकर झाडांच्या संरक्षणासाठी सरसावले

पुण्यात झाडांची कत्तल,पुणेकर झाडांच्या संरक्षणासाठी सरसावले

पुण्यातल्या गणेश खिंड रस्त्यावरच्या 20 मोठ्या झाडांपैकी आतापर्यंत तीन झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

  • Share this:

08 एप्रिल : पुण्यातल्या गणेश खिंड रस्त्यावरच्या 20 मोठ्या झाडांपैकी आतापर्यंत तीन झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

या परिसरात कडुनिंब, चिंच, निलगिरी, वड अशी झाडं आहेत.यातील कडुनिंबाची तीन झाडं तोडली.रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली झाडं कापण्याचा डाव,असाचा आरोप पुणेकर आणि खासदार अनिल शिरोळे यांनी केलाय.

या झाडांच्या संरक्षणासाठी पुणेकर अंथरुण पांघरुण घेऊन झाडांच्या शेजारी बसलेत. त्यातली बरीच झाडं 100 वर्ष जुनीही आहेत. पुणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचा कालावधी 31 मार्चला संपुष्टात आलाय. त्यामुळे या समितीनं विद्यापीठ रोडवरील वृक्षतोडीला परवानगी कशी दिली असा सवाल पुणेकरांनी उपस्थित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 02:15 PM IST

ताज्या बातम्या