Home /News /news /

तवेरा गाडीतून गांजाची बेकायदेशीर वाहतूक, आरोपीला अटक

तवेरा गाडीतून गांजाची बेकायदेशीर वाहतूक, आरोपीला अटक

22 किलो गांजासह आळेफाटा येथील आरोपी सिद्धेश दत्तात्रय शिंदेला अटक केली आहे.

पुणे, 24 जून :जुन्नर तालुक्यातील नारायणगाव गावच्या हद्दीत मांजरवाडी फाटा येथे तवेरा गाडीतून बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक होत असताना नारायणगाव पोलिसांनी कारवाई करत 22 किलो गांजासह आळेफाटा येथील आरोपी सिद्धेश दत्तात्रय शिंदेला अटक केली आहे. याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी माहिती दिली. पुणे ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार सुनील आनंदराव जावळे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकूण 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यामध्ये खाकी रंगाचे प्लॅस्टिक चिकटपट्टी असलेले औरंगाबाद पॅक असलेल्या चौकोनी आकाराचे एकूण 11 पुढया ताब्यात घेतल्या असून प्रत्येक पुढ्यात दोन किलो याप्रमाणे एकूण 22 किलो माल मिळून आला असून पॅकिंगसह एकूण वजन 20 किलो 950 ग्रॅम असे आहे. या गांजाचा प्रतिकिलो दर 15,000 रुपये प्रमाणे असून शेवरलेट कंपनीची पांढऱ्या रंगाची तवेरा गाडी ताब्यात घेतली आहे. मंगळवारी रात्री 10.35 वाजता नारायणगाव गावचे हद्दीत मांजरवाडी फाटा येथे यातील आरोप व त्याच्या ताब्यातील तवेरा गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून बुधवारी दुपारी 4 वाजता आरोपीवर गूंगीकारक औषधी द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8( अ ) , 20 (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई संदीप पाटील, पोलीस अधीक्षक, मा विवेक पाटील, अपर पोलीस अधीक्षक, दीपाली खन्ना, पोलीस उप अधीक्षक , पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि घोडेपाटील,पोउनी धोंडगे, ASI जगताप, पो.हवा. कोकणे , PN शिंदे ,PC शेडगे, PC भगत, PC साळुंखे यांनी केली.
First published:

पुढील बातम्या