अलिबागमध्ये उद्योगपतीच्या 200 कोटींच्या 'रिसॉर्ट'वर हातोडा पडणार, पाहा राजेशाही बंगल्याचे PHOTOS

अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर शेकडो कोटींचे अलिशान बंगले अवैधपणे उभारलेले आहेत. अनेक अभिनेते आणि बड्या उद्योपतींचे हे बंगले असून ते आता उद्धवस्त होणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 07:42 PM IST

अलिबागमध्ये उद्योगपतीच्या 200 कोटींच्या 'रिसॉर्ट'वर हातोडा पडणार, पाहा राजेशाही बंगल्याचे PHOTOS

मोहन जाधव, : प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांचा अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील राजेशाही असलेल्या हॉलिडे रिसॉर्टवर CRZचं उल्लंघन करून अनधिकृत केलेल्या वाढीव बांधकामावर उद्या 8 नोव्हेंबरपासून कारवाई करण्यास सुरुवात होणार आहे. (सर्व फोटो सौजन्य - मोहन जाधव, अलिबाग)

मोहन जाधव,अलिबाग : प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांचा अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील राजेशाही असलेल्या हॉलिडे रिसॉर्टवर CRZचं उल्लंघन करून अनधिकृत केलेल्या वाढीव बांधकामावर उद्या 8 नोव्हेंबरपासून कारवाई करण्यास सुरुवात होणार आहे. (सर्व फोटो सौजन्य - मोहन जाधव, अलिबाग)

अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी आज जाऊन पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेवर यंत्रसामुग्री न पाठविल्याने आजची कारवाई उद्यावर गेली आहे.

1 नोव्हेबर 2018 रोजी मुबंई उच्च न्यायालयाने मित्तल यांच्या अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अशोक मित्तल यांना 21 एप्रिल 2019 पूर्वी अनधिकृत बांधकाम स्वतःहून पाडावे अन्यथा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल अशी नोटीस दिली होती.

मात्र मित्तल यांनी स्वतःहून बांधकाम पाडण्यास सुरुवात केली असली तरी पूर्ण बांधकाम पाडले नाही. त्यामुळे प्रशासनाने दिलेली मुदत संपली असून जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचा हातोडा उचलणार आहे. अलिबागमध्ये विस्तिर्ण पसरलेला हा बंगला तब्बल 200 कोटींचा असल्याचं बोललं जातंय.

बॉम्बे इन्व्हरमेन्ट ऍक्शन ग्रुप व इतर यांनी अशोक मित्तल यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्या याचिकेनुसार मुंबई उच्च न्यायालयाने अशोक मित्तल यांनी अनधिकृत केलेले बांधकाम पाडण्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत.

Loading...

अशोक मित्तल यांनी अलिबाग तालुक्यात कोळगाव येथे 8 फेब्रुवारी 1999 मध्ये पूर्वीच्या मालकाकडून पाच एकर जागा विकत घेतली होती. पूर्वीच्या मालकाला मित्तल याना जागा विकण्याआधी या पाच एकर जागेत 514 स्के.मी. बांधकाम, एक पाण्याची टाकी व पाच मीटर पेक्षा जास्त उंच नसलेली भिंत बांधण्याची परवानगी रायगड जिल्हाधिकारी यांनी 4 डिसेंबर 1998 रोजी दिली होती.

त्यानंतर त्या मालकाने ही जागा अशोक मित्तल याना विकली होती. मात्र जिल्हाधिकारी यांनी आधीच्या मालकाला दिलेल्या बांधकाम परवानगीपेक्षा अशोक मित्तल यांनी जिल्हाधिकारी यांची वाढीव बांधकाम बाबत परवानगी न घेता 1407 स्के.मी.चे अनधिकृत वाढीव बांधकाम केलं.

या अनधिकृत वाढीव बांधकामाबाबत मित्तल यांनी जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांच्याकडे परवानगी मिळण्याबाबत मध्ये अर्ज केला होता.

मात्र जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांनी हा अर्ज फेटाळला होता. उच्च न्यायालयाने अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते.

या निकालाबाबत मित्तल यांची पत्नी निरुपम अशोक मित्तल यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मित्तल यांचे अपील फेटाळले.

लोकसभा निवडणुकीनंतर अशोक मित्तल यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होईल अशी शक्यता होती. मात्र ती झाली नाही.

आता विधानसभा निवडणुकीनंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला असून मित्तल यांचे आलिशान रिसॉर्ट जमीनदोस्त करण्यात येणार आहे.

 प्रशासनाला अधिकृत बांधकाम शाबीत ठेऊन अनधिकृत बांधकामावर जेसीबी फिरवायची आहे. त्यामुळे कोणते बांधकाम ठेवायचे हा एक प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे.

अलिबाग तालुक्यातील किहीम येथील डायमंड किंग निरव मोदी, धोकवडेमधील कुंदनमल तर मांडवा येथील कोठारी या मोठ्या उद्योगपतींचे बंगले सीआरझेडचे उल्लंघन केल्याबाबत जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केले आहेत.

तर आता अशोक मित्तल यांचाही राजेशाही हॉलिडे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार आहे. तर 580 जणांना पाठविलेल्या नोटीसीमुळे त्यांच्यावरही प्रशासनाची कारवाईची टांगती तलवार लटकलेली आहे.

बंगल्याच्या परिसरात मार्बलच्या अनेक मूर्ती असून आतून आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. बंगल्याच्या वरच्या मजल्यावरून समुद्राचे विहंगम दृश्य दिसत असून मुंबई शहरही दिसत आहे. तर बंगल्यात स्विमिंग पुलही बांधण्यात आला असून हॉलमध्ये कारंजे लावण्यात आलेली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 07:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...