• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • IIT मध्ये शिकण्याचं स्वप्न होणार पूर्ण? या शैक्षणिक वर्षासाठी IIT आणणार हे नवे कोर्सेस

IIT मध्ये शिकण्याचं स्वप्न होणार पूर्ण? या शैक्षणिक वर्षासाठी IIT आणणार हे नवे कोर्सेस

काही नवीन कोर्सेस IIT कडून या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर करण्यात आले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 जून: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology) म्हणजेच IIT मध्ये शिक्षण घेण्याचं स्वप्न प्रत्येक विद्यार्थी बघत असतो. त्यासाठी अगदी दहावीपासून तयारी करत असतो. मात्र प्रत्येकाला IIT मध्ये शिकणं शक्य होत नाही. IIT सुद्धा विद्यार्थ्यांसाठी नवनवीन कोर्सेस (New Courses in IIT) आणत असते. पदवीसाठी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी IIT कडून कोर्सेस सुरु केले जातात. असेच काही नवीन कोर्सेस IIT कडून या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर करण्यात आले आहेत. हे कोर्सेस M.Tech साठी असणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या कोर्सेसबाबत. 'मास्टर ऑफ पब्लिक पॉलिसी टेक्नोलॉजी अँड इनोवेशन (STI) आणि  डेवलपमेंट IIT दिल्ली (IIT Delhi) कडून शैक्षणिक सत्रात (2021-22) पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्रामसाठी 'मास्टर ऑफ पब्लिक पॉलिसी (MPP)). इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी (SPP) हा कोर्स सुरु करण्यात येणार आहे. हे वाचा - बँकेत नोकरी करायची आहे? लवकर करा अर्ज; आज शेवटचा दिवस ऑनलाईन MTech आणि MDes प्रोग्राम IIT हैदराबादननं (IIT Hyderabad) ऑगस्ट 2021 पासून सुरु होणारे वर्किंग प्रोफेशनलसाठी सात नवीन ऑनलाईन MTech कोर्स आणि एक ऑनलाईन MDes प्रोग्राम जाहीर केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समध्ये MTech IIT रुरकीकडून (IIT Roorkee) आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा सायन्स (Data Science) हा कोर्स सुरु करण्यात येणार आहे. शैक्षणिक सत्र 2021-22 साठी हा कोर्स असणार आहे. हा कोर्स करण्यासाठी उमेदवाराचं BE किंवा BTech असणं महत्त्वाचं आहे. e-मास्टर्स प्रोग्राम आयआयटी रुरकीनं पदव्युत्तर शिक्षणासाठी डिझाईन (DOD) विभागांतर्गत दोन अभ्यासक्रम सुरु केले आहेत. मास्टर इन डिझाइन  (industrial design) आणि मास्टर इन इनोवेशन मॅनेजमेंट (MIM) असं या दोन कोर्सेसचं नाव आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: