डीजेवर नाचायचंय तर मोकळ्या मैदानावर जा,चंद्रकांत पाटलांचा उदयनराजेंना टोला

डीजेवर नाचायचंय तर मोकळ्या मैदानावर जा,चंद्रकांत पाटलांचा उदयनराजेंना टोला

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार विजयी होईल असा दावाही पाटील यांनी केला

  • Share this:

विकास भोसले, सातारा, 28 सप्टेंबर : गणेशोत्सवात मोठं मोठ्याने सिनेमातील गाणी डॉल्बीवर लावण्यापेक्षा भजन लावा आणि जर नाचायचेच असेल तर प्रत्येक गावात एक मैदान असते जिथे जाऊन काय धिंगाणा घालायचा आहे तो घाला असा टोला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उदयनराजे भोसलेंना लगावला.

दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यातील 31गावांना टेम्भू जलसिंचन योजनेतून पिण्याचे पाणी दिले जाणार आहे या योजनेचे भूमिपूजन चंद्रकांतदादा पाटील,दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी डाॅल्बी वाजवणारच असा इशारा दिलाय त्याचा समाचार घेतला.

लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती चौकात आणला कारण, लोकांना संघटित करण्यासाठी आता मात्र चौकातील गणपती हा घरात घेऊन जाण्याची वेळ आलीये. मोठं मोठ्याने सिनेमातील गाणी डॉल्बीवर लावण्यापेक्षा भजन लावा असा सल्ला पाटील यांनी दिला. जर डाॅल्बीवर नाचायचेच असेल तर प्रत्येक गावात एक मैदान असते जिथे जाऊन काय धिंगाणा घालायचा आहे तो घाला अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

तसंच सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार विजयी होईल असा दावाही पाटील यांनी केला.

काँग्रेस-राष्ट्रवादीने आमचा धसका घेतला आहे, त्याच्यात दम असेल तर वेगवेगळे लढून दाखवावे असं आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी केलं.

संजय निरुपम यांनी युपीतील लोकांना आरक्षण मिळावे या केलेल्या मागणीबाबत चंद्रकांत पाटील यांनी या देशात लोकशाही आहे ते काहीही मागणी करू शकता असा खोचक टोलाही लगावला.

दरम्यान, दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासाठी टेम्भू ,उरमोडी जिहे कटपूर योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

तर दुसरीकडे डॅाल्बीने प्रदूषण होतंय तर राज्यातील कंपन्यांच्या प्रदुषणाचे काय?, विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टिव्हल डेसिबल दिसला नाही का ? असा सवाल साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलाय. तसंच मंगळवार तळे माझ्या मालकीचे तिथे काय करायचे काय नाही ते मी ठरवणार कंटेंट ऑफ कोर्ट होऊच शकत नाही आणि झाला तर तो माझ्यावर होईल अशा इशाराही उदयनराजेंनी दिला.

गणेशोत्सवदरम्यान, कोर्टाच्या आदेशानुसार डाॅल्बीवर मर्यादा घालण्यात आलीये. कोल्हापूर, सातारा परिसरात पोलिसांनी पहिल्याच दिवशी कारवाई करून सात लाखांचे डाॅल्बी सेट जप्त केले आहे अजून पोलीस ठिकठिकाणी कारवाई करत आहे.

=============================================================

VIDEO : कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका

First published: September 18, 2018, 5:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading