सावधान, बँकेत चुकीचा आधार कार्ड नंबर दिलात तर पडेल 'इतका' दंड

सावधान, बँकेत चुकीचा आधार कार्ड नंबर दिलात तर पडेल 'इतका' दंड

Pan Card, Aadhar Card - आर्थिक देवाणघेवाणीसाठी आधार कार्ड नंबर लागतो. पण तुम्ही चुकीचा नंबर दिलात तर मोठा दंड पडेल

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : सरकारनं मोठी  आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी पॅनऐवजी आधार कार्डाच्या नंबराचा पर्याय दिलाय. त्यामुळे आता अनेक कागदपत्रांवर आधार कार्डाचा नंबर टाकावा लागेल. पण हाच नंबर तुम्ही चुकीचा टाकलात तर मात्र काही खरं नाही. कारण आता चुकीचा आधार नंबर टाकलात तर तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. हा दंडाचा नियम 1 सप्टेंबर 2019पासून लागू होण्याची शक्यता आहे.

बँक अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे बँकेच्या कुठल्याही आर्थिक व्यवहारात आधार नंबर दिसला नाही तरीही 10 हजार रुपये दंड लागू शकतो. दंड लावण्याच्या आधी संबंधित व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. पण बँकेच्या व्यवहारांसाठी पॅन कार्डची गरज लागणार नाही.

15 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

Income Tax भरण्यासाठी PAN Card हवंच असा सरकारचा आजपर्यंतचा नियम होता. PAN Card नसल्यास आयकर भरणं शक्य होत नव्हतं. पण, आता काळजी करण्याची कारण नाही, तुम्ही PAN Card शिवाय देखील Income Tax भरू शकता. होय, आता PAN Card नसल्यास Income Tax भरणं शक्य होणार आहे. Income Tax भरण्यासाठी आता PAN Card ऐवजी आधार कार्ड चालणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

निवृत्त हो, नाहीतर संघाबाहेर बसवू ; धोनीला मिळाला इशारा?

पॅन आधारशी लिंक करणं गरजेचं

सीबीडीटी प्रमुखांनी सांगितलं की, पॅनशिवाय बँकेची कामं होत असली तरी आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना जोडणं गरजेचं आहे. तसा कायदाच  आहे.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल? बाळासाहेब थोरात आज दिल्लीत

 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, 1.2 अब्ज लोकांकडे आधार कार्ड आहे. देशातल्या 22 कोटी लोकांनी पॅन आणि आधार एकमेकांना लिंक केलंय. बँक खातं उघडणं, क्रेडिट, डेबिट कार्डासाठी अर्ज करणं यासाठी आधार कार्ड नंबर वापरता येईल.

SHOCKING: नाशिकमध्ये तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून, LIVE VIDEO आला समोर

First published: July 15, 2019, 1:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading