कांदा घेणे परवडत नसेल तर लसूण-मुळा खा, बच्चू कडूंचा हटके सल्ला, VIDEO

कांदा घेणे परवडत नसेल तर लसूण-मुळा खा, बच्चू कडूंचा हटके सल्ला, VIDEO

'कांदाचे भाव वाढले पाहिजे. कारण हा 70 वर्षांचा अनुशेष आहे. शेतकऱ्यांचा हा अनुशेष भरून निघाला पाहिजेट

  • Share this:

अमरावती, 21 ऑक्टोबर : परतीच्या पावसामुळे बळीराजा हवालदील झाला आहे. परतीच्या पावसाचा फटका हा कांद्याच्या किंमतीवर झाला आहे. कांद्याचे भाव वाढले आहे. त्यामुळे लोकांनी कांद्याचे भाव वाढले म्हणून बोंबलू नये, ज्याला कांदा खायचा असेल त्यांनी लसूण आणि मुळा खावा, असा सल्लाच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला.

केंद्र सरकारने इराणमधून नुकताच कांदा आयात केल्याने संपूर्ण देशासह राज्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, कांद्याचे भाव वाढले म्हणून सर्वसामान्य माणसाने बोंबलू नये, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.

तसंच, 'कांदाचे भाव वाढले पाहिजे. कारण हा 70 वर्षांचा अनुशेष आहे. शेतकऱ्यांचा हा अनुशेष भरून निघाला पाहिजे. ज्यांना कांदा परवडत नसेल त्यांनी लसूण आणि मुळा खावा. आता मीडियाने सुद्धा गृहिनीचे बजेट कोलमडले असे सांगू नये, असेही यावेळी कडू यांनी सांगितले.

मात्र, हा कांदा शेतकऱ्यांचा नसून आयात केलेला कांदा आहे. मग आयात केलेल्या कांद्याचा शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होईल, असाही प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थितीत केला.

दरम्यान, कांद्याचे भाव वाढत असल्याने सरकारने काही आठवड्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरुद्ध टीकाही झाली होती. आता सण आणि उत्सवांचे दिवस सुरू झाल्याने कांद्यांची मागणी वाढत असते. त्या काळात महागाई होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं.

कांद्याची निर्यात थांबली तर भाव आटोक्यात येतील असा अंदाज होता. मात्र, ज्या प्रमाणात भाव कमी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ते नियंत्रणात येत नव्हते.

Published by: sachin Salve
First published: October 21, 2020, 4:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या