• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • 'त्या' वेळी पीडितेने प्रतिकार न केल्यास तो बलात्कार नव्हे, उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

'त्या' वेळी पीडितेने प्रतिकार न केल्यास तो बलात्कार नव्हे, उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

दारू पिऊन मारझोड करतो म्हणून मुंबईतील एका व्यक्तीला त्याचाच कुटुंबानं लैंगिक छळाच्या प्रकरणात गुंतवल्याची घटना घडली आहे.

दारू पिऊन मारझोड करतो म्हणून मुंबईतील एका व्यक्तीला त्याचाच कुटुंबानं लैंगिक छळाच्या प्रकरणात गुंतवल्याची घटना घडली आहे.

अशा प्रकारच्या एका प्रकरणात बलात्काराचा आरोप असलेल्या एका आरोपीची कोर्टाने या आरोपातून मुक्तता केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : समाजात प्रेमसंबंधातून ( Love Affair) गुन्हे (Crime) घडल्याचं आपण पाहतो. संबंधित तरुणीला लग्नाचं वचन देऊन प्रियकर नंतर तिच्याशी विवाह करतच नाही, अशा अनेक घटना घडतात. तसंच, नंतर विवाह करणार म्हणून आधीच लैंगिक संबंधही (Sexual Relation) ठेवले जातात आणि जेव्हा ती तरुणी किंवा महिला गर्भवती झाल्याचं समजतं, तेव्हा तिला गर्भपात करायला सांगितला जातो, अशा घटना घडतात. अनेक प्रकरणांत प्रियकर यानंतर विवाहास नकारदेखील देतो. मद्रास उच्च न्यायालयाने अशा प्रकरणांबाबत एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. अशा प्रकारच्या एका प्रकरणात बलात्काराचा आरोप असलेल्या एका आरोपीची कोर्टाने या आरोपातून मुक्तता केली आहे. याबाबतचं वृत्त `लाइव्ह लॉ डॉट कॉम`ने दिलं आहे. आरोपीने पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवले, त्या वेळी संबंधित पीडितेनं प्रतिकार केला नाही तर त्या संबंधांना पीडितेची पूर्वसंमती आहे, असं मानलं जाईल, असं न्यायमूर्ती आर. पोंगियप्पन यांच्या खंडपीठाने (Madras High Court) म्हटलं आहे. या प्रकरणाची अधिक माहिती अशी. एकाच गावातला आरोपी आणि पीडित महिला यांच्यात एक वर्ष प्रेमसंबंध होते. हे दोघेही दररोज संध्याकाळी एकत्र भेटत असत. पीडित महिलेनं आरोपीला लग्नाविषयी विचारलं असता आरोपीने तिला लग्नाचं वचन दिलं. परंतु, त्यासोबत आरोपीने या महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली. मे 2009 मध्ये आरोपीने पीडित महिलेशी कथिरीत्या जबरदस्ती करत लैंगिक संबंध ठेवले आणि पीडित महिला गर्भवती राहिली. त्यानंतर जुलै 2009 मध्ये पीडित महिलेने आरोपीला लग्नाबाबत विचारलं असता, त्याने हा प्रस्ताव नाकारला आणि गर्भपात करण्याचा सल्ला दिला. हे ही वाचा-शिक्षेच्या भीतीने बलात्काराच्या आरोपीचं पीडितेशी लग्न, दोन्ही कुटुंबांच्या संमती त्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांनी आरोपीच्या आई-वडिलांशी या दोघांच्या विवाहाबाबत बोलणी केली असता, आरोपीच्या आई-वडिलांनी हुंड्यात (Dowry) सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये देण्याची मागणी केली. गावातील पंचायतीत देखील आरोपीने पीडितेशी विवाह करण्यास नकार दिला आणि त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. मदुराई येथील महिला न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपीला कलम 376 नुसार दोषी ठरवत शिक्षा सुनावली. यात अपीलकर्त्या आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला, की ही घटना पीडित मुलीने दिलेल्या पूर्वसंमतीने घडली आहे. आरोपी आणि पीडित मुलगी हे दोघेही नियमित भेटत असत आणि त्यांच्यात शारीरिक संबंध (Physical Relation) सुरू होते. पीडित तरुणीने दिलेली सहमती ही पूर्वसंमती आहे. त्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्यासाठी आरोपीला दोषी ठरवणे हे कायद्याच्या कक्षेत येत नाही, असं ते म्हणाले. याबाबत न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना म्हटलं आहे की घटनेच्या तारखेपासून अडीच महिन्यांनी पीडित महिलेनं या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. आरोपीच्या प्रेमात पडल्यानंतर आम्ही दररोज बागेत भेटत असू, त्यातूनच आमच्यात संबंध निर्माण झाल्याचं पीडित महिलेनं ट्रायल कोर्टात सांगितलं होतं. त्यावर न्यायालयाने नमूद केलं, की पीडितेच्या कृत्यातून स्पष्टपणे दिसून येतं की तिने लग्नाच्या आश्वासनावर भरवसा ठेवत आरोपीला लैंगिक संबंध ठेवण्यास परवानगी दिली होती. पीडित आणि अपीलकर्ता किंवा आरोपी हे घटनेवेळी प्रौढ होते. तसंच आरोपीने पीडितेशी लग्न करण्यासाठी कोणतीही निश्चित तारीख किंवा कालमर्यादा निश्चित केलेली नव्हती. न्यायालयाने असं नमूद केलं, की सांगितलेल्या परिस्थितीमुळे वस्तुस्थिती स्पष्ट होते, की संबंधित काळात पीडित मुलगीही तयार होती आणि आरोपीने त्याच्या भावाचं लग्न झाल्यानंतर तिच्याशी लग्न (Marriage) करण्याचं वचन दिलं होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून, पीडितेनं आरोपीसोबत राहणं सुरू केलं आणि हे कित्येक महिने सुरूच होतं. आरोपीने पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवले, त्या वेळी संबंधित पीडितेनं प्रतिकार केला नाही तर त्या संबंधांना पीडितेची पूर्वसंमती आहे, असं समजलं जातं. त्यामुळे अपीलकर्त्या आरोपीला बलात्काराच्या कलम 376 नुसार दोषी ठरवण्याचा मदुराई न्यायालयाचा निकाल रद्द केला. तसंच अपीलकर्त्या आरोपीची सर्व आरोपांमधून मुक्तता केली.
  First published: