आमच्या देशाने हिंदूंना दुबईत प्रवेश नाकारला तर...अरबी राजकन्येनं भारतीयांना विचारला प्रश्न

आमच्या देशाने हिंदूंना दुबईत प्रवेश नाकारला तर...अरबी राजकन्येनं भारतीयांना विचारला प्रश्न

यापूर्वीही अरबी राजकन्येने सोशल मीडियावर द्वेषपूर्ण संदेश पसरवणाऱ्यांविरोधात टिप्पणी केली होती. त्यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांचाही दाखल दिला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 एप्रिल : गेल्या काही आठवड्यांपासून संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) राजघराण्यातील राजकन्या हेंड अल कासिमी यांच्या सोशल मीडिया टाइमलाइनवर द्वेषपूर्ण आणि इस्लामोफोबिक टिप्पण्या केल्या जात आहे. यातील बरेच जण यूएईमध्ये काम करणारे भारतीय नागरिक आहेत. यावर राजकन्येने द्वेषपूर्ण संदेश पसरवणाऱ्यांविरोधात आवाज उठवला आहे.

अशा प्रवृत्तीवर राजदूत पवन कपूर यांनी चिंता व्यक्त केली आहे. पवन कुमार यांनी भारतीय नागरिकांना आवाहन केलं आहे. ते म्हणतात, भेदभाव हा आपल्या नैतिकता आणि कायद्याच्या नियमांविरुद्ध आहे. अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.

राजकन्या हेंडशी News18 ने बातचीत केली. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर येणाऱ्या टीकेवर दु:ख व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, 'अरब अमिराती-भारत संबंध शतकानुशतकापासून आहे.  "पण सध्या सुरू असलेल्या गोष्टी अनपेक्षित आहेत. यापूर्वी भारतीयाकडून द्वेषाचा अनुभव कधीच आला नव्हता."

" यापूर्वी कधीही भारतीयांनी अरब किंवा मुस्लिमांवर हल्ला केल्याचे माझ्या ऐकण्यात नाही. पण तुम्ही आता पाहाल तर माझ्या टाइमलाइन अरब, मुस्लिमांचा अपमान केला जात आहे. हे Un-indian आहे." सोशल मीडियावर द्वेषपूर्ण टिप्पण्या करणारे काही भारतीय हे यूएईमध्ये काम करणाऱ्या संपूर्ण भारतीयांचं प्रतिनिधित्व करतात असं नाही. मात्र लोकांमध्ये द्वेषाची भावना वाढत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

'जर सार्वजनिकरित्या मी असं म्हटंल की भारतीय हिंदूंना यूएईमध्ये प्रवेश नाही, तर भारतीयांना कसं वाटेल?' यापूर्वीही यूएईच्या राजकन्येने सोशल मीडियावर द्वेषपूर्ण संदेश पसरवणाऱ्यांविरोधात टिप्पणी केली होती. त्यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांचाही दाखल दिला होता. डोळ्यांच्या बदल्यात डोळे घेतले तर जग आंधळं होईल, असं गांधीजींनी म्हटल्याचे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. सोशल मीडियावरील द्वेषपूर्ण संदेशाविरोधात ती मोहीम चालवित आहे.

संबंधित - ...तर कोरोनापेक्षा उपासमारीने मरणाऱ्यांची संख्या असेल जास्त : नारायण मूर्ती

First published: April 30, 2020, 10:57 PM IST

ताज्या बातम्या