‘मायावती किंवा ममता बॅनर्जी PM झाल्या तर मी साधू होईन’

‘मायावती किंवा ममता बॅनर्जी PM झाल्या तर मी साधू होईन’

नुकताच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. यावेळी त्याने ममता बॅनर्जी आणि मायावती यांच्यावर आपल्या विचारांची तोफ डागली.

  • Share this:

मुंबई, १० एप्रिल- देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते आपल्या प्रचारात कोणतीही कमतरता पडू देत नाहीत. स्वयंघोषित सिनेसमीक्षक कमाल आर खान आता नेत्यांबद्दल बोलायलाही कमी करत नाही. नुकताच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. यावेळी त्याने ममता बॅनर्जी आणि मायावती यांच्यावर आपल्या विचारांची तोफ डागली. केआरकेने ट्वीट करत म्हटलं की, ‘जर मायावती किंवा ममता बॅनर्जी यांच्यापैकी कोणीही देशाचे पंतप्रधान झाले तर मी सिनेसमीक्षण करणं सोडून देईन आणि साधू होईन. तसंच सन्यास घेऊन कायमचा हिमालयात जाऊन तपश्चर्या करेन.’

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पंतप्रधान पदासाठी स्वतःचं नाव पुढे दिलं नसलं तरी यूपीए आणि एनडीए दोन्ही पक्षांना बहूमत मिळालं नाही तर या दोघी पंतप्रधान उमेदवारीसाठी उभ्या राहू शकतात.

First published: April 10, 2019, 2:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading