आईच्या गर्भाशयातच भांडल्या जुळ्या बहिणी, VIDEO झाला व्हायरल

आईच्या गर्भाशयातच भांडल्या जुळ्या बहिणी, VIDEO झाला व्हायरल

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आईच्या गर्भाशयात दोन जुळ्या मुली एकमेकांशी हालचाली करताना दिसत आहेत.

  • Share this:

चीन, 18 एप्रिल : घरात असलेल्या लहान बहिण-भावांना तुम्ही भांडताना पाहिलंच असेल. पण आता आईच्या गर्भाशयातच दोन बहिणींची भांडण सुरू झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी युट्यूबर पाहिलं आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे या व्हिडिओची चर्चा आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आईच्या गर्भाशयात दोन जुळ्या मुली एकमेकांशी हालचाली करताना दिसत आहेत. त्यामुळे त्या आत्तापासूनच एकमेकांशी मस्ती करत आहेत आणि भांडत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. अल्ट्रासाउंडच्या माध्यमातून हा व्हिडिओ काढण्यात आला आहे. यामध्ये या दोघीजणी एकमेकांना मारत आहेत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.


दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये हा व्हिडिओ मागच्या वर्षी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 4 महिन्यांच्या गर्भवती महिलेने 2 जुळ्या मुलींनी जन्म दिला आहे. मागच्या वर्षी त्या यिनचुआनमध्ये एका क्लिनिकमध्ये अल्ट्रासाउंड करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या जुळ्या मुलींचा हा व्हिडिओ त्यांच्या वडिलांनी शूट केला आहे.

हा व्हिडिओ मागच्या वर्षी एका चीनी व्हिडिओ अॅपद्वारे शेअर करण्याता आला होता. पण आतादेखील हा व्हिडिओ अनेकांच्या ट्रेंडिंग लिस्टवर आहे. या व्हिडिओला तब्बल 2.5 मिलियन लोकांनी पाहिला आहे. तर 4 लाख लोकांनी या व्हिडिओ लाइक केलं आहे.


मतदानानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: china
First Published: Apr 18, 2019 12:20 PM IST

ताज्या बातम्या