पंढरपूरच्या जयभीम तरुण मंडळानं घेतली, 141 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 127 व्या जयंतीनिमीत्त पंढरपूरच्या पंढरपूरच्या जयभीम तरुण मंडळाने आदर्श निर्णय घेतलाय. जयंतीच्या निमित्तानं जमा होणारे पैसे हे मंडळ १४१ होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करणार आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2018 03:15 PM IST

पंढरपूरच्या जयभीम तरुण मंडळानं घेतली, 141 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी

पंढरपूर,ता. 13 एप्रिल: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 127 व्या जयंतीनिमीत्त पंढरपूरच्या पंढरपूरच्या जयभीम तरुण मंडळाने आदर्श निर्णय घेतलाय. या मंडळानं जयंतीच्या निमित्तानं जमा होणारे पैसे दलित समाजातील १४१ होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर हे मंडळ खर्च करणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीला भव्य मंडप, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, कर्णकर्कश डॉल्बी, जंगी मिरवणूकीवर लाखोंची उधळपट्टी केली जाते. मात्र या सगळ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत बाबासहेबांना अपेक्षीत असलेला उपक्रम राबविण्याचा निर्णय या मंडळानं घेतल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि आरपीआयचे शहर अध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आहे. मंडळाच्या या उपक्रमाचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 03:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...