S M L

भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 10 दिवसांत शिखर धवन होणार फिट

ICC Cricket World Cup : भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे 3 आठवडे खेळू शकणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2019 06:10 PM IST

भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 10 दिवसांत शिखर धवन होणार फिट

ट्रेंट ब्रिज, 12 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतानं आपली विजयी घौडदौड सुरु केली. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला धुळ चारल्यानंतर विराटसेनेचं लक्ष्य आता न्यूझीलंडचा संघ आहे. मात्र, या सामन्याआधी भारताला मोठा धक्का बसला. भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन याच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळं तीन आठवडे तो महत्त्वाच्या सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळं धवन ऐवजी कोणाला संधी मिळावी, याची चर्चा सध्या रंगली आहे. असे सगळे असताना, आता सलामीवीर शिखर धवन लवकरच फिट होण्याच्या मार्गावर आहे.

गुरुवारी भारतीय संघ न्युझीलंड विरोधात खेळणार आहे. मात्र, या सामन्यात धवन खेळू शकणार नाही आहे. असे असले तरी, सरावासाठी धवन मैदानात दिसला. त्यामुळं तो लवकरच फिट होऊ शकतो, अशी अपेक्षा केली जाऊ शकते. ANIनं ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये इतर खेळाडूंसोबत धवन सराव करताना दिसत आहे. त्यामुळं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात धवन खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




दुसरीकडे, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याआधी झालेल्या मुलाखतीत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आले होते. यावेळी बांगर यांनी," आम्ही धवनच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत. धवनच्या दुखापत लवकर बरी होईल, अशी आम्हाला आशा आहे. धवन 10-12 दिवसांमध्ये फिट होईल, असे आम्हाला वाटते. रिषभ पंत मँचेस्टर येथे काही वेळात दाखल होणार आहे.", अशी माहिती दिली. याआधी बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार धवनला संघाच्या बाहेर करण्यात आलेले नाही. धवनवर इंग्लंडमध्येच उपचार करण्यात येणार आहेत.


Loading...


ऑस्ट्रेलियाविरोधात धवन झाला होता जखमी

ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात फलंदाजी करत असताना शिखर धवनच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. जलद गोलंदाज कुल्टर नाईलचा चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला होता.त्यामुळं त्याला दुसऱ्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करता आले नाही. याच सामन्यात धवननं 117 धावांची खेळी केली होती. त्यामुळं धवनची कमी विराटला जाणवणार आहे.

वाचा- ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा

वाचा- World Cup : सलामीला केएल राहुल तर धवनच्या जागी 'हा' खेळाडू मिळवून देणार विजय?

वाचा- वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का


SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 06:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close