टॉन्टन, 12 जून : ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर यानं ICC Cricket World Cupमध्ये पाकिस्तान विरोधात शतकी खेळी केली. चेंडूत फेरफार केल्यानंतर वॉर्नरवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर पाकिस्तान विरोधात वॉर्नरनं पहिल्यांदा शतकी खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमधले व़ॉर्नरचे हे 15वे शतक होते. त्यानं 102 खेळाडूंच्या जोरावर 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 100 धावा पुर्ण केल्या. त्याच्या 107 खेळीच्या आणि फिंचच्या 82 खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 307 धावांपर्यंत मजल मारली. फिंच आणि वॉर्नर वगळता कोणत्याही फलंदाजांनी चांगली फलंदाजी करता आली नाही.
पाकिस्तान विरोधात वॉर्नरचे हे सलग तिसरे शतक आहे. याआधी दोन एकदिवसीय सामन्यात त्यानं 130 आणि 179 अशी शतकी खेळी केली होती. चेंडूत फेरफार केल्याच्या आरोपावरून वॉर्नरवर एका वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आयपीएलच्या बाराव्या हंगामात ऑरेंज कॅपचा मानकरी झालेल्या वॉर्नरची वर्ल्ड कप संघात निवड़ करण्यात आली. मात्र वर्ल्ड कपमध्ये वॉर्नरच्या वाट्याला काही चांगले प्रसंग आले नाहीत. त्यानं चांगली खेळी केली असली तर, प्रेक्षकांकडून त्याला चांगली वागणुक मिळाली नाही. इंग्लंड विरुध्दच्या सराव सामन्यातही प्रेक्षकांनी वॉर्नर आणि स्मिथ यांना चीटर, चीटर म्हणत डिवचले. असाच काहिसा प्रकार भारत विरुद्धही झाला. मात्र, भारत विरुद्ध वॉर्नरनं केवळ अर्धशतकी खेळी केली होती. आज पाकिस्तान विरुद्ध केलेल्या या शतकी खेळीमुळं वॉर्नरचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार आहे.
पाकिस्ताननं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच वॉर्नर आणि फिंच यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. फिंच आणि वॉर्नर यंनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 146 धावांची भागीदारी केली. त्याचवेळी त्यानं अर्धशतकी खेळी केली. बॅननंतर वॉर्नर आणि स्मिथ दोन्ही फलंदाज चांगल्या लयीत दिसत आहेत. पाकिस्तान विरुद्ध स्मिथला चांगली खेळी करता आली नाही.
वाचा- ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा
वाचा- World Cup : सलामीला केएल राहुल तर धवनच्या जागी 'हा' खेळाडू मिळवून देणार विजय?
वाचा- वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का
SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?