IND vs WI : हवामान खात्याचा अंदाज सांगतो टॉस जिंकून घ्यावा 'हा' निर्णय

IND vs WI : हवामान खात्याचा अंदाज सांगतो टॉस जिंकून घ्यावा 'हा' निर्णय

वेस्ट इंडिजला नमवणे, भारतासाठी सोपे असणार नाही. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कार्लोस ब्रॅथवेटने केलेली तुफानी खेळी सर्वांच्या स्मरणात राहणारी आहे.

  • Share this:

मॅंचेस्टर, 27 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सामना होणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे की काय, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांसमोर आहे. कारण याआधी न्यूझीलंडविरोधात भारताचा एक सामना रद्द झाला आहे. त्यामुळं मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हवामान सध्या वाईट आहे, मंगळवारपासून येथे पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळं भारतीय संघाला सरावही करता आला नाही.

भारतीय संघाची सध्या विजयी घौडदौड सुरु आहे. भारतीय संघानं आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला. आज वेस्ट इंडिजला नमवत सेमिफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. मात्र वेस्ट इंडिजला नमवणे, भारतासाठी सोपे असणार नाही. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कार्लोस ब्रॅथवेटने केलेली तुफानी खेळी सर्वांच्या स्मरणात राहणारी आहे. वेस्ट इंडिजला केवळ पाच धावांनी पराभव पत्करावा लागल्याने त्यांच्या उपांत्य फेरीच्या अपेक्षांन सुरुंग लावला. पण, तरीही अन्य संघांच्या कामगिरीवर विंडीजच्या किंचितशा आशा कायम आहेत. त्यामुळे भारताविरुद्ध विजयासाठी ते प्रयत्नशील असणार आहेत.

असे असेल हवामान

हवामान खात्यानुसार सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवशी बरसलेला पाऊस आज विश्रांती घेणार आहे. आज तापमान 23 डिग्री असेल, त्यामुळं हवमानात गारवा असला तरी, ऊन असणार आहे. मात्र सामन्यादरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे.

खेळपट्टीचा अंदाज

या मैदानावर आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेचे तीन सामने झाले आहेत. या तिनही सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारलेली आहे. सुर्यप्रकाश असल्याने खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी असणार आहे. फिरकीपटूंना थोडी साथ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरेल.

हेड टू हेड

वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही संघ एकूण आठवेळा समोरासमोर आले आहेत. त्यात भारतीय संघाने 5, तर विंडीजने 3 विजय मिळवले आहेत. 1996च्या वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाने विंडीजविरुद्धी विजयी परंपरा कायम राखली आहे. ओल्ड ट्रॅफर्डवर उभय संघ दुसऱ्यांदा भिडतील.

वाचा- World Cup IND vs WI : 'माही मार रहा है', आज सिद्ध करून दाखवण्याची संधी!

वाचा- गेली 23 वर्ष भारत 'या' संघाविरुद्ध अपराजीत राहिला; आज काय होणार?

वाचा- सामन्याआधीच भारतानं इंग्लंडला दिला दणका, हिसकावून घेतले पहिले स्थान

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीची राजकीय बॅटिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 12:52 PM IST

ताज्या बातम्या