World Cup : 'कॉफीनं जीभ भाजली आता चहाही आवडत नाही'

कॉफी विथ करन प्रकरणावर हार्दिक पांड्यानं पहिल्यांदाच केले भाष्य.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 01:09 PM IST

World Cup : 'कॉफीनं जीभ भाजली आता चहाही आवडत नाही'

लंडन, 07 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. यातच साखळी सामन्यातील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेवर भारतानं एकहाती विजय मिळवला. यात रोहित शर्मा आणि केएल राहुलची शतकी खेळी यामुळं श्रीलंकेनं दिलेल्या 265 धावांचे आव्हान भारतानं 43.3 षटकात पूर्ण केले.

श्रीलंकेविरोधात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रात भारतानं चांगली कामगिरी केली. गोलंदाजांनी पहिल्या 20 ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांना वेसन घातले. या सामन्यात केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांची खेळी महत्त्वाची ठरली. मात्र एक वेळ असाही होता जेव्हा या दोन्ही खेळाडूंची कारकिर्द संपुष्टात आली होती असेच वाटले होते. ते प्रकणर होते कॉफी विथ करनचे. कॉफी विथ करन या कार्यक्रमात हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी महिलांवर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळं त्यांच्यावर बीसीसीआयनं काही सामन्यांची बंदी घातली होती मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या फॉर्ममध्ये सुधार केला होता.

आयपीएलमध्ये केएल राहुल आणि हार्दिक पांड्या या दोघांनी चांगली कामगिरी केली होती. हार्दिक पांड्याच्या मॅच विनिंग खेळीनं मुंबई इंडियन्सचे आयपीएलचे किताब जिंकले होते. दरम्यान पांड्या आणि राहुल यांनी पहिल्यांदाच स्टार स्पोर्टसशी बोलताना कॉफी विथ करन प्रकरणावर भाष्य केले. यावेळी हार्दिकनं मस्करीत मला कॉफी काय चहाही आवडत नाही, असे सांगितले.

या मुलाखती दरम्यान हार्दिकनं, "आम्ही आमची चूक मान्य केली आहे. या एका चूकीमुळं आमचं आयष्य संपलं असं नव्हत. त्याच-त्याच गोष्टी सतत मनात राहिल्या की त्या आयुष्यभर सोबत असताना म्हणून आम्ही स्वत:च्या कामगिरीत सुधारणा करायचे ठरवले", असे मत व्यक्त केले. तसेच "लोकांना वाटलं होतं आमची कारकिर्द संपली. पण राहुल-राहुल सारखा आणि मी माझ्या प्रमाणेच खेळ करत रोहिलो. आम्ही सकारात्मक होतो, त्यामुळं कमबॅक करू शकलो", असेही हार्दिक म्हणाला.

दुसरीकडे राहुलनं या विषयावर बोलताना, "जे झालं ते फार वाईट होतं. पण मला खरचं वाटतं की मला एका धक्क्याची गरज होती, भानावर येण्यासाठी. आता मी क्रिकेटबाबत गंभीर झालो आहे. त्यामुळं आता त्या गोष्टींचा विशेष फरक पडत नाही", असे सांगितले.

Loading...

भारत मंगळवारी न्यूझीलंड विरोधात सेमीफायनल सामना खेळणार आहे. न्यूझीलंडविरोधातील साखळी सामन्यातील सामना पावसामुळं रद्द झाला होता. तसेच, पहिल्यांदाच भारत-न्यूझीलंड यांच्यात सामना होत आहे.

वाचा- World Cup : 5 शतक करूनही नाही खूश, 8 वर्षांपासून रोहितच्या मनात खदखद

वाचा- धोनीनं झिवा आणि ऋषभ पंतसोबत धरला ठेका, मिस करू नका हा VIDEO

वाचा- Happy Birthday : झिरो ते हिरो; धोनीच्या करिअरमधील 20 खास

VIDEO: भाताची लावणी करताना गायलेली ही पारंपरिक गीत तुम्ही ऐकलीत का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 01:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...