World Cup : कार्तिक म्हणतो...मी कसाही खेळाडू असो, माझी चर्चा तर होणारच !

World Cup : कार्तिक म्हणतो...मी कसाही खेळाडू असो, माझी चर्चा तर होणारच !

कार्तिकनं आतापर्यंत 26 कसोटी सामने तर, 91 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मे : क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणजे क्रिकेट विश्वचषक. या स्पर्धेसाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळं भारतीय संघासह सर्वच संघ विश्वचषकाची जय्यत तयारी करित आहेत. दरम्यान भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे, मात्र विराटसेनेच्या संघातील संभाव्य खेळाडूंची निवड झाल्यापासून चर्चा आहे. यातील एक खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक दिनेश कार्तिक.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 15 वर्षांआधी पदार्पण करणाऱ्या कार्तिकला आपलं स्थान भारतीय संघात एकदाही पक्के करता आले नाही. त्याला गरजेनुसार संघात घेतले जाते. त्यामुळं त्याच्यावर नेहमीच टीका केली जाते. मात्र, आता याबाबत कार्तिकनं एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्याच्या मते, तो संघाला गरज असेल तेव्हाच संघात असतो. ज्याप्रमाणे आता त्याला ऋषभ पंत ऐवजी संघात घेण्यात आले, मात्र त्याला 11 खेळाडूंच्या संघात स्थान मिळेल का, याबाबत साशंकता आहे.

'या' गोष्टीचं कार्तिकला समाधान

आपल्या संघातील अनिश्चित स्थानाबद्दल कार्तिक म्हणतो की, “मला एका गोष्टीचा आनंद आहे की, माझे कुटुंब आणि मित्रपरिवार नेहमीच माझ्या सोबत असतो. चांगल किंवा वाईट असो, लोक तुमची चर्चा करतात, म्हणजे तुम्ही महत्त्वाचे आहात. हेच माझ्यासाठी समाधानकारक आहे”.

'या' स्पेशल खेळाडूमुळं कार्तिकला मिळाली नाही संधी

15 वर्षांपूर्वी कार्तिकनं भारतीय संघात प्रवेश केला. मात्र यष्टीरक्षक म्हणून त्याला आपले स्थान टिकवून ठेवता आले नाही. त्याचे कारण म्हणजे, महेंद्रसिंग धोनी. धोनी जर भारतीय संघात नसता तर, कार्तिकला संघात स्थान मिळाले असते. कार्तिकनं आतापर्यंत 26 कसोटी सामने तर, 91 एकदिवसीय सामने खेळले आहेत. पण धोनीमुळं तो संघाबाहेर आहे, याचे त्याला वाईट वाटतं नाही तर, आनंदच होतो.

सराव सामन्यात मिळणार का संधी ?

30मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. मात्र असे असले तरी, आज भारत न्युझीलंड विरोधात आपला पहिला सराव सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंना इंग्लंडच्या परिस्थितीचा अंदाज येईल. त्यामुळं या सामन्यात तरी, दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

असे असतील भारताचे सामने

5 जून : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (दु. 3 वाजता)

9 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिय (दु. 3 वाजता)

13 जून : भारत विरुद्ध न्युझीलॅंड (दु. 3 वाजता)

16 जून : भारत विरुद्ध पाकिस्तान (दु. 3 वाजता)

22 जून : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दु. 3 वाजता)

27 जून : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (दु. 3 वाजता)

30 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (दु. 3 वाजता)

2 जुलै : भारत विरुद्ध बांगलादेश (दु. 3 वाजता)

6 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (दु. 3 वाजता)

वाचा-हिटमॅनने सांगितलं, 2011 च्या वर्ल्ड कप संघातून त्याला का वगळलं?

वाचा- वर्ल्ड कपसाठी विराटला हवा 'हा' परदेशी खेळाडू!

वाचा- World Cup : विराटचं टेंशन वाढलं, सामन्याआधीच महत्त्वाचा खेळाडू जखमी

वाचा- World Cup : ‘या’ खेळाडूमुळं वर्ल्ड कपआधी पाकिस्तान संघातील वाद चव्हाट्यावर

VIDEO: धक्कादायक! पवना नदीत हजारो मृत माशांचा खच

First published: May 25, 2019, 1:21 PM IST

ताज्या बातम्या